Pahalgam Terror Attack : हल्ल्यातून बचावलेले सुबोध पाटील यांनी सांगितला थरारक अनुभव, म्हणाले

माध्यमांशी बोलताना सुबोध पाटील यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मी जखमी झालो. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी मला मलमपट्टी करून स्थानिक रुग्णालयात नेले.

91

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील(Pahalgam Terror Attack) प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक अनुभव माध्यमांना सांगितला. नवी मुंबईतील सुबोध पाटील यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी अनुभवकथन करून तेथील परिस्थितीची जाणीव सर्वांना करून दिली. माध्यमांशी बोलताना सुबोध पाटील यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मी जखमी झालो. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी मला मलमपट्टी करून स्थानिक रुग्णालयात नेले.

Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन

ते पुढे म्हणाले, दहशतवादी हल्ल्याच्या(Pahalgam Terror Attack) ठिकाणी आम्हाला मागून काही आवाज ऐकू आला, पण तो आवाज नेमका कसला होता हे आम्हाला ओळखता आले नाही. त्यानंतर काही सेकंदातच मग आम्हाला सतत आवाज ऐकू आला आणि लोक धावताना दिसले. आम्हाला भीती वाटली, म्हणून आम्हीही पळू लागलो. आमच्या समोर काही लोक एकत्र बसलेले दिसले, म्हणून आम्हीही तिथे बसलो. अशाप्रकारे बैसरन खोऱ्यातील २२ एप्रिल रोजी घडलेला संपूर्ण घटनाक्रम सुबोध पाटील यांनी यावेळी माध्यमांना सांगितला.

पहलगाम हल्ल्यातून(Pahalgam Terror Attack) बचावलेले सुबोध पाटील पुढे असे म्हणाले की, एक दहशतवादी आला आणि म्हणाला, “तुमच्यात हिंदू कोण आहेत? उभे राहा!” त्याचक्षणी दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्यात मला गोळी लागली आणि मी बेशुद्ध पडलो. मी बऱ्याच तासांनी जागे झाल्यावर माझ्या आजूबाजूला मृतदेहांनी पडलेले आढळले. ज्या स्थानिकाने मला तिथे (बैसरन कुरणात) वर आणले त्याने मला ओळखले. त्याने मला पाणी दिले. तिथून तो मला बाईकवर खाली घेऊन गेला. लष्करी जवानांनी मला मलमपट्टी केली आणि रुग्णालयात नेले. तिथून मला हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मला सात दिवस तिथे दाखल करण्यात आले, असे सुबोध पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.(Pahalgam Terror Attack)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.