पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारताने सिंधु करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी एक विधान केले असून ‘जम्मू-काश्मीर हल्ल्याचा बदला घेईपर्यंत स्वागत नाही’, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमात पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला असून पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)चा बदला घेईपर्यंत स्वागत नाही, असे सी आर पाटील यांनी सांगितले.
(हेही वाचा India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले … )
केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी जागतिक गुंतवणूकदार परिषदेत एक धक्कादायक विधान केले असून केंद्रीय मंत्र्यांनी पुष्पगुच्छ किंवा स्मृतीचिन्ह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. ते पुढे म्हणाले, अलिकडीलप पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)तील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आपण स्वागताचे कोणतेही प्रतीक स्वीकारणार नाही. विशेष म्हणजे कालच्या कार्यक्रमाला मदत करणाऱ्या एका व्यक्तीने जाहीर केले की पहलगाम हल्ल्या(Pahalgam Terror Attack)तील गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत मंत्र्यांनी असे कोणतेही स्वागत सन्मान स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)त २६ पर्यटक मृत्युमुखी पडले होते. या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सशस्त्र दलांना दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासंदर्भात वेळ आणि स्वरूप निश्चित करण्यासाठी पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले आहे. केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी याआधीच म्हटले होते की, हल्ल्यानंतर सरकार “सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही” पाकिस्तानात जाऊ देणार नाही.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community