
पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत पाकिस्तानवर कारवाई करणार आहे. त्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये चांगलेच उमटत आहे. पाकिस्तान सरकारने भारताच्या कारवाईची प्रचंड धास्ती घेतली आहे. भारताने पाकिस्तानी नेत्यांची झोप उडवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही पाकिस्तानला फटकारले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयएसआय चीफ आसिम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आले आहे. (Pahalgam Terror Attack)
भारताचीच सेम टू सेम कॉपी
ही नियुक्ती 29 एप्रिल रोजी करण्यात आली होती. परंतु, 30 एप्रिल रोजी मध्यरात्री माध्यमांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये असीम मलिक यांना आयएसआय प्रमुख बनवण्यात आले होते. एप्रिल मध्ये मोईद युसूफ यांच्यानंतर पाकिस्तानमध्ये एनएसए नियुक्ती करण्यात आली नव्हती. या नियुक्तीनंतर, असीम मलिक यांच्याकडे आता दोन जबाबदाऱ्या (आयएसआय प्रमुख आणि एनएसए) असतील. यापूर्वी 30 एप्रिल रोजी, भारत सरकारने एनएसए बोर्ड (एनएसएबी) ची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ (RAW) प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Pahalgam Terror Attack)
हेही वाचा-Pahalgam Attack नंतर भारतात ‘या’ पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड !
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली असून एनएसएबीमध्ये माजी रॉ प्रमुखांसह 7 सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे माजी अधिकारी समाविष्ट आहेत. तसेच, माजी राजनयिक आणि माजी आयपीएस अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. एनएसएबी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाला माहिती देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समिती (सीसीएस) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी, पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर 23 एप्रिल रोजी सीसीएसची बैठक झाली होती. (Pahalgam Terror Attack)
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ (एनएएसएबी) ची स्थापना 1998 मध्ये पहिल्यांदा करण्यात आली होती. एनएसएबी महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला (एनएससी) सल्ला देईल असा निर्णयही घेण्यात आला. 2018 मध्ये पुन्हा एकदा हे मंडळ स्थापन करण्यात आले. त्यानंतर रशियामध्ये भारताचे राजदूत असलेले पी.एस. राघवन यांना त्याचे प्रमुख बनवण्यात आले. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community