पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारतीय सैन्यदले सज्ज झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्णपणे मोकळीक दिली आहे. अशातच आता भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याशी बैठक घेतल्यानंतर एका दिवसातच ही बैठक झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारताने दहशतवादाविरोधात कडक करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
(हेही वाचा India-Pakistan War : युद्ध झाल्यास चार दिवसही भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान ! )
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंह यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. नौदल प्रमुखांच्या भेटीनंतर हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)संदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना या बैठकीत नेमकं काय घडलं याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
२२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी संरक्षण दलाला स्पष्ट निर्देश दिले की भारतीय सशस्त्र दलांना हल्ल्याला देशाच्या प्रतिसादाचे स्वरूप, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे “पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य” आहे. त्या आधीच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community