पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) दहशतवाद्यांची क्रूरता समोर येत आहे. या हल्ल्यात पीडित आपापले अनुभव सांगत आहेत. यातील एक धक्कादायक अनुभव एका महिला पर्यटकाचा अनुभव आहे. पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा, अशा तिघांना दहशतवाद्यांनी घेरले आणि त्यांनी त्यातील पतीला ठार केल्यानंतर पत्नी त्या दहशतवाद्यांनी म्हणाली, माझ्या पतीला मारले मग मलाही मारा, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना म्हटले, तुझ्या पतीला ठार केले आहे, तुला मारणार नाही जा, पण हे मोदींना सांग, असे म्हटले.
Manjunath & Pallavi from Karnataka were on vacation in Kashmir.
Husband Manjunath was k*lled by Islamic terrorists after they confirmed his Hindu identity.
She begged them to k*ll her as well, but jihadis said, “You need to be alive to tell this to Modi.”
पल्लवी यांनी या हल्ल्याचा (Pahalgam Attack) घटनाक्रम सांगितला. आम्ही तिघे मी, माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. दुपारी १.३० च्या सुमारास हे सगळे घडले. आम्ही पहलगाममध्ये होतो. माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जागीच मृत्यू झाला. ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे. हल्ल्यानंतर लगेचच स्थानिक लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि तीन स्थानिक लोकांनी माझा जीव वाचवला, असे पल्लवी यांनी सांगितले. तीन-चार दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य करत हा हल्ला केला. मी त्यांना म्हणाले की, मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या पतीला आधीच मारले आहे. त्यापैकी एक म्हणाला, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जा आणि हे मोदींना सांगा,असेही पल्लवी यांनी म्हटले.
मंजुनाथ आणि पल्लवी यांनी त्यांचा काश्मीरमधील एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात दोघे जण त्यांच्या काश्मीर दौऱ्याची माहिती देत आहेत, पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात पल्लवी यांना दहशतवाद्यांना क्रूर अनुभव आला.
पर्यटनासाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. (Pahalgam Attack) या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० पर्यटक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. कर्नाटकच्या एका व्यक्तीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला धमकावले. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे कर्नाटकातील शिवमोगा येथील एका व्यक्तीचा दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले मंजुनाथ हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह पहलगाम येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी बेसरन परिसरात त्यांच्यासह इतर पर्यटकांवर गोळीबार केला. यात मंजुनाथ यांचा मृत्यू झाला.