Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन

Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन

140
Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन
Pahalgam Attack : पाकिस्तान एवढा घाबरला की जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन

जम्मू-काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack) प्राथमिक तपास अहवाल एनआयएने तयार केला आहे. एनआयएच्या तपास अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या कटाचे पुरावे सापडले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये केली गेली. भारताला थेट अणुबॉम्बची धमकी देण्यात आली. या घडामोडींना भारत सरकारने देखील गंभीरतेने घेतले आहेत. त्यामुळे या हल्ल्याचा मोदी सरकारने बदला घ्यावा, अशी भावना देशभरात आहे. (Pahalgam Attack)

हेही वाचा-Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती

भारताकडून अद्याप कोणतीही लष्करी कारवाई झालेली नाही, परंतु पाकिस्तानच्या विविध भागांत भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तान एवढा घाबरला आहे की, खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात 12 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. (Pahalgam Attack)

हेही वाचा-Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम

पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन का जारी करण्यात आला? यावर उत्तर देताना उपायुक्त कॅप्टन (निवृत्त) बिलाल शाहिद राव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जमरूद भागातील ‘पंप हाउस गुंडी मोहल्ला’ येथे मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण मोहल्ल्यात 12 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जरी स्थानिक प्रशासन याला आरोग्याच्या कारणास्तव घेतलेला निर्णय सांगत असले, तरी तज्ज्ञांचे मत आहे की, भारताकडून संभाव्य प्रत्युत्तर कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानच्या संवेदनशील भागांत आधीच सतर्कतेच्या मोडवर कारवाई केली जात आहे. (Pahalgam Attack)

हेही वाचा- Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू

लॉकडाऊनदरम्यान काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये किराणा दुकाने, औषधांची दुकाने, जनरल स्टोअर्स, तंदूर आणि आपत्कालीन सेवा यांचा समावेश आहे. याशिवाय इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. जमरूदचे सहायक आयुक्त आणि खैबर पोलिसांना लॉकडाऊन काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Pahalgam Attack)

हेही वाचा- Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात

खरंतर खैबरसारख्या भागांतही प्रशासकीय कठोरता दिसत आहे. म्हणजेच भारताची कारवाई अद्याप झाली नसली, तरी त्याची भीती पाकिस्तानात लॉकडाऊनच्या रूपात दिसत आहे. (Pahalgam Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.