Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याचा मृत्यू ; प्रसंग कॅमेऱ्यात कैद

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याचा मृत्यू ; प्रसंग कॅमेऱ्यात कैद

130
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याचा मृत्यू ; प्रसंग कॅमेऱ्यात कैद
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याचा मृत्यू ; प्रसंग कॅमेऱ्यात कैद

पहलगामच्या दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack ) करणाऱ्या दहशतवाद्यांना ज्या व्यक्तीने रसद पुरवली, त्याने नदीत उडी मारून स्वत:ला संपवलं आहे. दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली या आरोपीने दिली होती. दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला. पळ काढून त्याने विश्वा नदीत उडी मारली, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या आरोपीने नदीत उडी मारतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Pahalgam Attack )

इम्तियाज अहमद मगरे असं या आरोपीचं नाव आहे. इम्तियाज मगरे याला पोलिसांनी 3 मे रोजी ताब्यात घेतलं होतं. पहलगामच्या दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पोलीस त्याला ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणाहून त्याला दहशतवाद्यांच्या तळावर नेले जात होते. मात्र पोलिसांच्या हातातून सुटून त्याने विश्वा नदीत उडी घेतली आहे. त्याचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला हा आरोपी 23 वर्षांचा होता. (Pahalgam Attack )

इम्तियाज याने दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याचं कबुल केलं होतं. दहशतवादी ज्या ठिकाणी लपलेले आहेत, ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले होते. मात्र मध्येच त्याने विश्वा नदीत उडी घेतली. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी मृत आरोपी हा महत्त्वाचा दुवा होता. मात्र त्याने नदीत उडी घेत स्वत:ला संपवलं. (Pahalgam Attack )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.