
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर हवाई संरक्षण प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमेर इवान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पाकड्यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताकडे पाकिस्तानमध्ये घुसून अचूक हल्ला करण्याची ताकद आहे, मग ते रावळपिंडी, खैबर पख्तूनख्वा असो किंवा इतर कोणताही भाग असो. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, भारताकडे इतकी ताकद आहे की ते पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला सहज लक्ष्य करू शकतात. (Operation Sindoor)
#WATCH | Delhi: DG Army Air Defence Lt Gen Sumer Ivan D’Cunha says, “India has an adequate arsenal of weapons to take on Pakistan right across its depth. So, from its broadest to its narrowest, wherever it is, the whole of Pakistan is within range… The GHQ (General… pic.twitter.com/U8jFcmIC8Y
— ANI (@ANI) May 19, 2025
लेफ्टनंट जनरल सुमेर इवान म्हणाले की, “संपूर्ण पाकिस्तान आमच्या हद्दीत आहे. जरी पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मुख्यालय रावळपिंडीहून खैबर पख्तूनख्वा हलवले तरी त्यांना लपण्यासाठी एक खोल खड्डा शोधावा लागेल.” (Operation Sindoor)
शिशुपाल तत्व स्वीकारले
लेफ्टनंट जनरल सुमेर इवान पुढे बोलताना म्हणाले की, भारताच्या लष्करी विचारसरणीत बदल झाला आहे. आता आपण फक्त सहन करत नाही, तर योग्य वेळी योग्य प्रतिसाद देण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. ज्याला त्यांनी शिशुपाल तत्व म्हणून संबोधले. शिशुपाल सिद्धांतानुसार, लेफ्टनंट जनरल म्हणाले, जोपर्यंत रेषा ओलांडली जात नाही तोपर्यंत आम्ही सहन करतो, परंतु रेषा ओलांडताच आम्ही निर्णायक कारवाई करतो. या रणनीतीद्वारे, भारताने जगाला हे दाखवून दिले आहे की आता दहशतवादाविरुद्ध बचावात्मक भूमिका घेण्याऐवजी आक्रमक भूमिका स्वीकारली गेली आहे. (Operation Sindoor)
स्वयंपूर्ण लष्करी तंत्रज्ञान
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञान आणि लष्करी शाखांमध्ये समन्वय दिसून आला. भारतीय लष्कराच्या ड्रोन डिटेक्शन आणि इंटरसेप्शन सिस्टीमने शत्रूच्या यूएव्हीना निष्क्रिय केले. लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांनी कोणत्याही नागरिकांच्या जीवितहानीशिवाय दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. हवाई दल, लष्कर आणि गुप्तचर संस्थांनी एकत्रित कमांड स्ट्रक्चर अंतर्गत समन्वित पद्धतीने काम केले. यावर डी’कुन्हा म्हणाले की, आम्ही केवळ सीमांचे रक्षण केले नाही तर छावण्या, नागरी क्षेत्रे आणि आमच्या सैनिकांच्या कुटुंबांनाही सुरक्षित ठेवले. हा आपला खरा विजय आहे. (Operation Sindoor)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community