Operation Sindoor अंतर्गत पहिल्यांदाच पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं; केंद्रीय गृहमंत्र्यांचा पुनरुच्चार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून पुन्हा एकदा इशारा दिला आहे. Operation Sindoor अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यांच्या अणुबॉम्ब धमकीला भीक घालत नसल्याचेही गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

33

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून पुन्हा एकदा इशारा दिला आहे. Operation Sindoor अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यांच्या अणुबॉम्ब धमकीला भीक घालत नसल्याचेही गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, पहिल्यांदाच पाकिस्तानच्या आत १०० किमी आत घुसून कारवाई करण्यात आली, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)वर म्हटले. भारताच्या कारवाईने दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला की जर कोणतीही दहशतवादी घटना घडली तर त्याला दुपटीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला दिला.

(हेही वाचा “केवळ अर्थव्यवस्थेतच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही…”; ‘Operation Sindoor’नंतर जगाला कळली भारताची ताकद )

ते पुढे म्हणाले, भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित करण्यात कोणतीही कसर सोडली नसून त्याच वेळी पंतप्रधानांनी देशाला सुरक्षित बनवण्यासाठीही काम केल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंत ०३ मोठे हल्ले झाले आहेत. या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा Turkistan च्या विरोधात फास आवळण्यास सुरुवात; भारतीय मुत्सद्देगिरीला यश )

गांधीनगर येथील अनेक प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी भारतीय सैन्यदलाच्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या यशाबद्दल तिन्ही सैन्यदलांचे कौतुक केले. ते म्हणाले, उरी हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईकने, पुलवामा हल्ल्याला हवाई हल्ल्याने तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे ०९ अड्डे उद्ध्वस्त केल्याचा पुनरुच्चार करतानाच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटर आत घुसून प्रत्युत्तर दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)ने पाकिस्तान बिथरला

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान घाबरला आहे आणि जग आश्चर्याने पाहत आहे. पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र भारतीय भूमीवर पडू शकले नाही, एकही ड्रोन भारतीय सीमेवर पडू शकले नाही, आम्ही पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. याशिवाय, पाकिस्तानात बसलेले १०० हून अधिक भयानक दहशतवादीही मारले गेले. आम्ही नूर खान एअरबेस आणि सरगोधा एअरबेससह पाकिस्तानचे ११ एअरबेस नष्ट केले. आम्ही हायड्रोजन बॉम्बच्या धमकीला घाबरणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.

सिंदूरचा आदर करणे भारताची परंपरा – अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “सिंदूरचा आदर करणे ही एक भारतीय परंपरा आहे. संपूर्ण जगाला एकाच वेळी बातमी देण्यासाठी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये दिलेले वचन पूर्ण केले. त्यांनी म्हटले होते की आम्ही दहशतवादाचा नाश करू. आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धाडसाने दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा नाश केला आहे.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.