‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जैशचा मोरक्या मसूद अझहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात अजगर गंभीर रित्या जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला एक मोठं यश हाती आलं असल्याचे बोलले जात आहे. (Operation Sindoor)
BIG BREAKING: Abdul Rauf Asghar, brother of JeM chief Masood Azhar and key conspirator in the 1999 IC-814 Kandahar hijack, killed in Indian airstrikes targeting terror hubs in Pakistan.
Sare suar maare jaye 🚀🚀🚀
Jai hind jai bharat#IndiaPakistanWar#IndianArmy… pic.twitter.com/Vbd6ZygL9d— Shivam Verma (@Shivam_Verma_98) May 8, 2025
दहशतवाद पोसणाऱ्यांना मोठा धक्का
एकीकडे मौलाना मसूद अझर यांच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याने जैश ही दहशतवादी संघटना पूर्णतः बिथरली होती. अशातच जैशचा मोरक्या मसूद असगरचा दहशतवादी भाऊ रौफ अजगरचा खात्मा झाल्याने दहशतवाद्यांना आणि दहशतवाद पोसणाऱ्यांना एक फार मोठा धक्का बसला आहे. मुरिदकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात तो काल जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. (Operation Sindoor)
प्रकरण काय ?
कंदाहार विमान अपहरण प्रकरण, ज्याला IC-814 अपहरण म्हणूनही ओळखले जाते, हे भारताच्या नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त घटना आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी, इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट IC-814 या एअरबस A300 विमानाचे अपहरण करण्यात आले. हे विमान नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीकडे निघाले होते. भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी, पाच हिजबुल मुजाहिदीनच्या (Harkat-ul-Mujahideen) दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. (Operation Sindoor)
Abdul Rauf Asghar, brother of JeM chief Masood Azhar and key conspirator in the 1999 IC-814 Kandahar hijack, killed in Indian airstrikes targeting terror hubs in Pakistan.
Power of New India 🇮🇳👏🏼 pic.twitter.com/ItprofoKZT
— Sumit (@SumitHansd) May 8, 2025
विमानात 179 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. अपहरणकर्त्यांनी विमानाला अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे उतरवले. दुबईमध्ये त्यांनी 27 प्रवाशांना सोडले आणि एका प्रवाशाची हत्या केली. शेवटी, विमान अफगाणिस्तानमधील तालिबान-नियंत्रित कंदाहार येथे उतरवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली. यानंतर मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख, मुश्ताक अहमद झरगर या तिघांची सुटका 31 डिसेंबर 1999 रोजी करण्यात आली, ज्यामुळे अपहरण समाप्त झाले. (Operation Sindoor)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community