‘Operation Sindoor’ दरम्यान भारताच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या वापराने जग अवाक्, नेमकं काय घडलं जाणून घ्या

'Operation Sindoor' दरम्यान भारताच्या हाती खजिना लागला असून जगातील मोठ्या शक्ती आपल्याकडे हात पुढे करताना दिसून येत आहेत. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान भारताने रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या मदतीने चीन आणि पाकिस्तानला धोबीपछाड दिला. रिव्हर्स इंजिनिअरिंगचा भारताला ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

66

‘Operation Sindoor’ दरम्यान भारताच्या हाती खजिना लागला असून जगातील मोठ्या शक्ती आपल्याकडे हात पुढे करताना दिसून येत आहेत. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान भारताने रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या मदतीने चीन आणि पाकिस्तानला धोबीपछाड दिला. रिव्हर्स इंजिनिअरिंगचा भारताला ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

दि. ०९ मे २०२५ रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे या क्षेपणास्त्राचे तुकडे सापडलेच नाहीत तर हे क्षेपणास्त्र जवळजवळ पूर्णपणे सुरक्षित देखील आढळले. आता जागतिक शक्ती देखील या रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या मागे लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानने डागलेले चिनी पीएल-१५ई क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करून भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक मोठी कामगिरी केली.

(हेही वाचा Operation Sindoor अंतर्गत पहिल्यांदाच पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं; केंद्रीय गृहमंत्र्यांचा पुनरुच्चार )

विशेष म्हणजे भारताने केवळ ही क्षेपणास्त्रे पाडली नाहीत तर त्यांचा मलबाही परत मिळवला. आता या क्षेपणास्त्राच्या अवशेषांनी जागतिक शक्तींचे लक्ष वेधले आहे. फाइव्ह आयज देश (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स), फ्रान्स आणि जपान हे कचरा मिळविण्यात रस दाखवित आहेत. ९ मे २०२५ रोजी पंजाबमधील होशियारपूरमध्ये या क्षेपणास्त्राचे तुकडेच सापडले नाहीत तर हे क्षेपणास्त्र जवळजवळ पूर्णपणे सुरक्षित देखील आढळले. त्यामुळे आता भारताच्या तंत्रज्ञानाचे जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय हवाई दलाच्या एअर मार्शल भारती यांनी १२ मे २०२५ रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पाकिस्तानने जे-१०सी आणि जेएफ-१७ लढाऊ विमानांमधून ही क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु, भारताच्या एस-४०० आणि आकाश अ‍ॅरो हवाई संरक्षण प्रणालींनी त्यांना निष्क्रिय केले. या सर्व घटनेमागे रिव्हर्स इंजिनिअरिंगचा हात असल्याचे बोलले जात आहे.

रिव्हर्स इंजिनिअरिंगचा इतिहास जुना

रिव्हर्स इंजिनिअरिंग, म्हणजेच तंत्रज्ञानाचे विघटन करणे आणि त्याची रचना आणि कार्यपद्धती समजून घेणे. यामुळे लष्करी आणि तांत्रिक क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. जगभरातील देशांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे शत्रूच्या तंत्रज्ञानाची नक्कल केली आणि स्वतःची ताकद वाढवली. हे यावरून समजते की जेव्हा ओसामा बिन लादेनला मारताना पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये अमेरिकन हेलिकॉप्टर बिघडले तेव्हा अमेरिकन सैन्याने ते तिथेच पूर्णपणे नष्ट केले. जेणेकरून पाकिस्तान आणि चीन रिव्हर्स इंजिनिअरिंग करता कामा नये.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.