ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या संदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावरून दुसऱ्यांदा काँग्रेसने विधान केले असून त्यांचं वक्तव्य हे गुन्हा आहे आणि ते पापाच्या श्रेणीत येते, असे काँग्रेसने म्हटले. त्यामुळे यासर्व प्रकारातून नेते राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचेच दिसून येत आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी एस. जयशंकर यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत असा आरोप केला आहे की, भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ले करण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती. तथापि, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कबूल केले होते की ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला सतर्क केले होते, या काँग्रेसच्या विधानाचे परराष्ट्र मंत्रालयाने दि. १७ मे रोजी खंडन केले होते.
भाजप नेत्याकडून राहुल गांधींवर टीकेची झोड
भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधींचा मूर्खपणा हा केवळ योगायोग नाही. हे धोकादायक आहे. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशा शब्दांत भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठविली आहे.
शेवटी, राहुल गांधी काय म्हणाले?
पाकिस्तानला हल्ल्याची आधीच माहिती असल्याने आपण किती विमाने गमावली असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. ही चूक नव्हती. तो एक गुन्हा होता. आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देश पाकिस्तान, दहशतवाद आणि शत्रूंविरुद्ध एकत्र उभा असताना हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष काँग्रेस कोणाच्या बाजूने उभे आहेत?, असा प्रश्न यानिमित्ताने देशवासियांच्या मनात निर्माण होताना दिसून येत आहे.(Operation Sindoor)