Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या भारतीय सैन्यदलांच्या कारवाईची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आली. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हेदेखील यावेळी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
(हेही वाचा Operation Sindoor : शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएसची उच्चस्तरीय बैठक )
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलाने केलेल्या अभूतपूर्व कारवाईबाबत सविस्तर माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलांच्या शौर्य आणि समर्पणाचे कौतुक केले असून भारताने दहशतवादाविरोधात केलेली कारवाई यशस्वी झाली. अशा आशयाची पोस्ट राष्ट्रपती भवनाने अधिकृत एक्सवरून केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचं मोडलं कंबरडं
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले करण्यात आले होते. भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील ०९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली असून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी केली असून पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत केलेला सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा उल्लेख केला. तसेच, पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्याचे म्हटले.
Join Our WhatsApp Community