Operation Sindoor : पहलगाम हल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर दिले असून ५ दहशतवादी कमांडरचा खात्मा केला. मध्यरात्री ०१.०५ वाजताच्या सुमारास पाकिस्तान आणि पीओकेमधील तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त करण्यात आले. मीडियाच्या अहवालानुसार, पंतप्रधान मोदी रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor)वर लक्ष ठेवून होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं भारताच्या तिन्ही सैन्यदलांचं कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, हा नवा भारत असून सबंध देश या कारवाईकडे पाहत होता. त्यामुळे ही कारवाई होणं अपिरहार्य होतं, असे पंतप्रधान मोदींनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार, ‘ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor)अंतर्गत हवाई हल्ल्यातून ९ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर करण्यात आली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community