Pakistan : दहशतवाद्यांच्या ‘जनाजा’मध्ये पाक लष्करी अधिकारी; भारताने खोटारड्या पाकिस्तानचे जगाला दाखवले पुरावे

62
Pakistan : दहशतवाद्यांच्या 'जनाजा'मध्ये पाक लष्करी अधिकारी; भारताने खोटारड्या पाकिस्तानचे जगाला दाखवले पुरावे

भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताच्या सीमाभागात नागरिकांवर हल्ला केला, तसेच देशातील ७ लष्करी तळांवर हल्ला केला, मात्र भारताने लष्करी तळांवरील हल्ले फोल ठरवले. मात्र त्यानंतर भारताने थेट लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणालीच उद्ध्वस्त केली. रावळपिंडी येथील एअर डिफेन्स सिस्टीमही नष्ट केली. याविषयाची माहिती देण्यासाठी पुन्हा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यामध्ये मिस्त्री यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादी वृत्तीची जंत्रीच मांडली.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जे हल्ले केले त्यामध्ये पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ नष्ट केली. त्यात जे दहशतवादी ठार झाले, त्यांचा जनाजा काढला तेव्हा त्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानने (Pakistan) त्यांच्या झेंड्यात गुंडाळले होते. त्याच्या जनाजाला पाकिस्तानचे सैन्य अधिकारी, मंत्री, दहशतवादी संघटनांचे म्होरके उपस्थित होते. त्याचा फोटोच सचिव मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.

(हेही वाचा Pakistan च्या पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांचे ‘ते’ सर्व दावे खोटे; भारताने केले FACT Check)

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पुनरुच्चार केला की, भारताची कारवाई दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यापुरती मर्यादित होती; आम्ही नागरिकांवर किंवा लष्करी आस्थापनांवर हल्ला केला नाही, तर फक्त दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या (Pakistan) मंत्र्यांनी येथे दहशतवादी नसल्याचे केलेले विधान पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. पाकिस्तान अजूनही जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे, असे मिस्त्री म्हणाले.

लादेनला हुतात्मा कोणी म्हटले..?

ओसामा बिन लादेन पाकिस्तानात (Pakistan) सापडला, तिथेच मारला गेला अन् पाकिस्तानने त्याला ‘हुतात्मा’ म्हटले. पाकिस्तानने “संयुक्त चौकशी” करण्याची ऑफर पुन्हा एकदा वेळ वाचवण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक रणनीती आहे. 26/11 आणि पठाणकोट सारख्या हल्ल्यांच्या तपासात भारताने सहकार्य केले, परंतु पाकिस्तानने नाही. जर पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा हल्ला केला, तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पाकिस्तानकडून पुढील कोणत्याही कृतीला योग्य प्रतिसाद दिला जाईल, असा इशाराही विक्रम मिस्त्री यावेळी दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.