भारतीय सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असून रजेवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानसह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित सरकारी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर, गृहमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जम्मू, काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल देखील उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) सुरू झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर(पीओके)मधील ०९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने सुरू केलेल्या कारवाईंच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)नंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्याशीदेखील चर्चा केली.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community