जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं आहे. भारताचा ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात 9 ठिकाणचे दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले आहेत. (Operation Sindoor)
जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त
भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं. (Operation Sindoor)
दहशतवादी तळांवर हवाई हल्ले
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांत ही कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. सियालकोट, सरजल, गुलपूर, बिलाल कॅम्प, अहमदपूर, फैसलाबाद या ठिकाणीही क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. (Operation Sindoor)
पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले आहे. (Operation Sindoor)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community