‘Operation Sindoor’मध्ये इस्त्रोची भूमिका निर्णायक; लक्ष्य ते शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यापर्यंत, कसे ते जाणून घ्या

Operation Sindoor : भारताने 'Operation Sindoor' अंतर्गत दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्याचे पाहायला मिळाले होते. याच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्त्रो)ने निर्णायक भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.

40

Operation Sindoor : भारताने ‘Operation Sindoor’ अंतर्गत दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्याचे पाहायला मिळाले होते. याच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्त्रो)ने निर्णायक भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्यदलाच्या कारवाईत लक्ष्य ओळखण्यापासून ते शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यापर्यंत इस्त्रोने विकसित केलेल्या भारतीय उपग्रहांनी भारतीय सैन्यदलांना मोलाची साथ दिली.

दरम्यान, Operation Sindoor दरम्यान देशाच्या सुरक्षेत इस्रोची भूमिका अभूतपूर्व होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इस्रोच्या उपग्रहांनी, विशेषतः रिसॅट आणि कार्टोसॅटने, भारतीय सैन्याला शत्रूचे स्थान, हालचाली आणि लपण्याच्या ठिकाणांबद्दल अचूक माहिती दिली. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्यदलांना शत्रूवर योग्य प्रहार करण्यास मदत मिळाली.

महत्त्वाचे म्हणजे भारत आपल्या अवकाश आणि संरक्षण क्षमतांना नवीन उंचीवर घेऊन जात आहे. त्यातच आता इस्त्रोने आपल्या १०१ व्या मोहिमेचा भाग म्हणून दि. १८ मे २०२५ रोजी सकाळी ०५.५९ वाजता EOS-०९ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. उपग्रहाचे प्रक्षेपित श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे करण्यात येणार आहे. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताच्या शत्रूंवरील देखरेखीच्या क्षमता आणखी सक्षम होईल.

‘Operation Sindoor’मध्ये इस्रोची महत्त्वाची भूमिका

‘Operation Sindoor’ दरम्यान देशाच्या सुरक्षेत इस्रोची भूमिका अभूतपूर्व होती. इस्रोच्या उपग्रहांनी, विशेषतः रिसॅट आणि कार्टोसॅटने मोठी भूमिका बजावली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, या उपग्रहांनी भारतीय सैन्याला शत्रूचे स्थान, हालचाली आणि लपण्याच्या ठिकाणांबद्दल अचूक माहिती पुरवली. म्हणूनच भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडल्याशिवाय २३ मिनिटांत लक्ष्य यशस्वीरित्या नष्ट केले.

इस्रोच्या तंत्रज्ञानामुळे भारताला दहशतवादी आणि शत्रूच्या तांत्रिक हालचाली, संरक्षण प्रतिष्ठाने, रडार, हवाई संरक्षण प्रणाली आणि शस्त्रास्त्रांचे स्थान आणि सामरिक तयारी याबद्दल आगाऊ माहिती मिळाली. या उपग्रहांचे उच्च रिझोल्यूशन इमेजिंग आणि अंधारातही काम करण्याची क्षमता यामुळे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना हाणून पाडणाऱ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १० उपग्रहांनी भारतीय सैन्याला मदत केली.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.