Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर गुजरातमधील भूज एअरबेसवरून (Bhuj Airbase) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर मोठा हल्ला चढवला आहे. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेचे केवळ या देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही कौतुक होत आहे. या ऑपरेशनमध्ये तुम्ही केवळ शत्रूवर वर्चस्व गाजवले नाही. तर त्यांना संपवण्यातही यशस्वी झाला आहात. दहशतवादाविरुद्धची ही कारवाई आपल्या हवाई दलाच्या नेतृत्वाखाली झाली. आपले हवाई दल हे एक असे ‘स्काय फोर्स’ आहे, ज्याने आपल्या शौर्य, धैर्य आणि वैभवाने आकाशाच्या नवीन उंची गाठल्या आहेत. तसेच राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. वेळ आल्यावर संपूर्ण चित्रपट दाखवेन’ असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला दिला. (Operation Sindoor)
भारतीय हवाई दलाची पोहोच प्रत्येक कोपऱ्यापर्यंत
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आपल्या हवाई दलाची पोहोच पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत आहे. तसेच ही काही छोटी गोष्ट नाही, हे पूर्णपणे सिद्ध झाले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, भारताची लढाऊ विमाने सीमा ओलांडल्याशिवाय देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. तसेच पाकिस्तानच्या भूमीवरील नऊ दहशतवादी तळ कसे उद्ध्वस्त केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, त्यानंतरच्या कारवाईत त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय हवाई दलाने केवळ शौर्य दाखवले नाही. तर संपूर्ण जगाला त्याचे प्रमाण दिले आहे. आता भारताचे युद्ध धोरण आणि तंत्रज्ञान दोन्ही बदलले आहे याचा पुरावा. तुम्ही संपूर्ण जगाला नवीन भारताचा संदेश दिला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli Retires : विराटने निवृत्तीपूर्वी रवी शास्त्री यांच्याशी काय चर्चा केली होती?)
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. या काळात भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची ५ विमाने पाडली. यामध्ये २ लढाऊ विमानांचा समावेश होता.
(हेही वाचा – ५०वा Sikkim राज्य स्थापना दिवस, चोग्याल राजघराण्यासोबत Sikkim चा इतिहास जाणून घ्या)
भारत आता स्वावलंबी झाला आहे
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारत केवळ परदेशातून आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहीला नाहीये. तर भारतात बनवलेले शस्त्रे देखील आपल्या लष्करी शक्तीचा भाग बनली आहेत. आता संपूर्ण जगाने पाहिले आहे की, भारतात आणि भारतीय हातांनी बनवलेली शस्त्रे अचूक आणि अभेद्य आहेत. पाकिस्तानने स्वतः ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे. आपल्या देशात एक खूप जुनी म्हण आहे आणि ती म्हणजे दिवसा तारे दाखवा. पण भारतात बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने रात्रीच्या अंधारात पाकिस्तानला दिवसाचा प्रकाश दाखवला आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे, ज्यामध्ये ‘आकाश’ आणि डीआरडीओने बनवलेल्या इतर रडार प्रणालींनी मोठी भूमिका बजावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community