भारताने Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात मोठा कारवाई केली. भारताच्या बेधडक कारवाईनंतर विमानसेवेत अडथळा निर्माण झाला असून इंडिगोने देशातील ११ शहरांमधील उड्डाणे रद्द केली. देशांतर्गत एअरलाईन इंडिगोने उत्तर, वायव्य आणि मध्य भारतातील ११ शहरांमधील उड्डाणे दि. १० मेपर्यंत रद्द केली आहेत.
(हेही वाचा India-Pakistan Border वरील तणाव वाढला; पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर राजनाथ सिंह सीमेकडे रवाना )
दरम्यान, इंडिगोने जारी केलेल्या माहितीनुसार, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगढ आणि राजकोट ही प्रभावित शहरे आहेत. या ठिकाणांहून दि. १० मे रोजी सकाळी ०५:२९ पर्यंत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बजेट कॅरियरने ‘एक्स’वर विमान वाहतूक निर्देशांचे पालन करून, या शहरांना जाणारी/येणारी उड्डाणे १० मे, ०५:२९ वाजेपर्यंत रद्द राहतील, असे म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या यशस्वितेनंतर केंद्र सरकारच्या आदेशांनंतर विमानतळ बंद करण्याबाबत विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द करण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे इंडिगोकडून जाहीर करण्यात आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
देशातील ०९ विमानतळे दि. १० मेपर्यंत बंद राहणार असून जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह आणि जामनगर विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून १० मेपर्यंत सकाळी ०५.२९ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community