Operation Sindoor : भारताच्या कारवाईत नऊ तळांवरील १०० दहशतवादी ठार, सोमवारी पुन्हा पाकिस्तानच्या डीजीएमओंशी चर्चा; भारतीय सैन्यदलांची माहिती

Operation Sindoor : भारतीय सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली आहे. याआधीच भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेतून Operation Sindoorबाबत तपशील देण्यात आले आहेत.

72

Operation Sindoor : भारतीय सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली आहे. याआधीच भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेतून Operation Sindoorबाबत तपशील देण्यात आले आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून ०९ दहशतवादी तळदेखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे

दरम्यान, कुख्यात दहशतवादी अजमल कसाबने प्रशिक्षण घेतलेला मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी तळ भारतीय सैन्याकडून पूर्णपणे नेस्तानाबूत करण्यात आल्याची माहिती भारतीन सैन्यदलाने दिली. तसेच, श्रीनगर ते नलियापर्यंत पाकिस्तानी ड्रोन आल्याचे सैन्यदलाने सांगितले. भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल एके भारती म्हणाले, ऑपरेशन सिंदूरचा हेतू हा दहशतवादी तळांना नष्ट करणे हा आहे. आम्ही पाकिस्तानातील नागरिक, सैन्य यांना लक्ष्य बनविलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Pakistan अण्वस्त्र हल्ला करण्याच्या होता तयारीत? भारताने पोलखोल केल्यावर अमेरिकेने खडसावले आणि… )

पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यावेळी नागरी विमानांचा आधार घेतल्याचेही एअर मार्शल भारती यांनी सांगितले. भारताच्या प्रत्युत्तरात ३० ते ४० सैनिक, अधिकारी मारले गेल्याची माहितीदेखील पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले. भारताच्या हल्ल्यात ०३ मुख्य दहशतवादी मारले गेले असून बहावलपूर आणि मुरीदके भारतीय हवाई दलाच्या प्रमुख लक्ष्यावर होते, असे एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले.

उद्या पाकिस्तानच्या डीजीएमओंशी चर्चा होणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानमधील सरगोधा एअरफील्डची धावपट्टी भारताने हल्ला करून उद्ध्वस्त केली. आरिफवाला एअर डिफेन्सदेखील या हल्ल्यात नष्ट करण्यात आली. जम्मू, उधमपूर, पठाणकोट बेसवर ड्रोन हल्ल्याला भारतीय सैन्याने गरुड स्नायपरच्या मदतीने चोख प्रत्युत्तर दिले. व्हाईस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नौदल हे लष्कर आणि हवाई दलाच्या संपर्कात होतं.Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.