Operation Sindoor : ‘रामचरितमानस’चा संदर्भ, समझदारों को इशारा…; सैन्यदलांची झंझावाती पत्रकार परिषद

Operation Sindoor :  हवाई दलाचे एअर मार्शल एके भारती यांनी Operation Sindoorबाबत महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून यात पाकिस्तानचे मोठं नुकसान झाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यदलांचं कुठलेही नुकसान झालेले नाही. भारताचे एअरबेस, संरक्षण सामुग्री सुरक्षित असल्याचे एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले.

80

Operation Sindoor :  हवाई दलाचे एअर मार्शल एके भारती यांनी Operation Sindoorबाबत महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून यात पाकिस्तानचे मोठं नुकसान झाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यदलांचं कुठलेही नुकसान झालेले नाही. भारताचे एअरबेस, संरक्षण सामुग्री सुरक्षित असल्याचे एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले. एअर मार्शल एके भारती, कमोडोर ए एन प्रमोद, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत नवीन अपडेट्स दिले.

(हेही वाचा Pakistan Super League : पाकिस्तानची आणखी नाचक्की; युएईचा पीएसएल भरवायला नकार )

पाकिस्तानकडून वापरण्यात आलेले ड्रोन तुर्की बनावटीचे होते. यामार्फत झालेला ड्रोन हल्ला भारताने हाणून पाडला. भारताकडून रामचरितमानसमधील काही ओळींचा दाखला देत पाकिस्तानला स्पष्ट इशाराच दिला. भय बिन होयु प्रीत असे सांगत समझदारोंको इशारा काफी है, अशा शब्दांत भारतीय सैन्यदलांकडून पाकिस्तानला कडक इशारा दिला.

ते पुढे म्हणाले, भारतीय सैन्यदलाचे सर्व एअरबेस, लष्करी तळं सुरक्षित असून आगामी ऑपरेशनकरिताही तयार असल्याची माहिती एअर मार्शल भारती यांनी दिली. पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाला पाकिस्तानच जबाबदार आहे, अशा शब्दात भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला फटकारलं. विशेष म्हणजे १२ मे रोजी होणारी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चा सायंकाळी असेल.याआधीच भारतीय सैन्यदलाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.