“केवळ अर्थव्यवस्थेतच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही…”; ‘Operation Sindoor’नंतर जगाला कळली भारताची ताकद

'Operation Sindoor'नंतर आता भारत केवळ अर्थव्यवस्थेतच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. Operation Sindoorच्या माध्यमातून जगाने भारताची ताकद अनुभवली असून नव्या संरक्षण धोरणानंतर भारताने इस्त्रायल, अमेरिका आणि रशिया यांच्या गटात प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाशी संबंधित असली तर भारत एक उदयोन्मुख जागतिक शक्ती बनला आहे.

37

‘Operation Sindoor’नंतर आता भारत केवळ अर्थव्यवस्थेतच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. Operation Sindoorच्या माध्यमातून जगाने भारताची ताकद अनुभवली असून नव्या संरक्षण धोरणानंतर भारताने इस्त्रायल, अमेरिका आणि रशिया यांच्या गटात प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाशी संबंधित असली तर भारत एक उदयोन्मुख जागतिक शक्ती बनला आहे.

(हेही वाचा ‘भारतासाठी बोलणाऱ्यांचा राहुल गांधींना द्वेष का?’; काँग्रेस सरचिटणीसांच्या पोस्टनंतर Shashi Tharoor यांचा उल्लेख करत भाजपचा सवाल )

भारताने संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारले असून क्वाड(QUAD) आणि (I2U2) सारख्या जागतिक व्यासपीठांचा भाग आहे. त्याचसोबत भारताने ‘Operation Sindoor’मध्ये वापरलेल्या ब्रम्होस क्षेपणास्त्राच्या निर्मितीत भारत-रशिया या राष्ट्रांची भागीदारी मजबूत संरक्षण सहकार्य प्रस्थापित करतात. ऑपरेशन सिंदूरनंतर देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा भारत नवा भारत आहे. दहशतवादाविरुध्दची भारताची कठोर, जलद कारावाई देशाच्या सुरक्षा धोरणाचा भाग असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे कंबरडं मोडायची रणनीतीच आखली. पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणतानाच दहशतवाद्यांचे तळदेखील उद्ध्वस्त केले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करतानाच १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्माही केला. या धडक कारवाईने भारताची संरक्षण शक्ती सबंध जगाला दिसली. तसेच, भारत आगामी काळात सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असा थेट संदेश याकृतीतून जगाला दिला.

भारताची तांत्रिक ताकद अन् पाकिस्तानची हार

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताने आपल्या लष्करी ताकदीचे, रणनीतीचे आणि तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट वापरून भारतीय नागरी वस्त्या आणि लष्करी तळांवर हल्ला केला. पण भारताने फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले. भारतीय लष्कराने त्यांच्या एकात्मिक हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीद्वारे लष्करी तळ आणि मालमत्ता पूर्णपणे संरक्षित केल्या.

भारताच्या क्षेपणास्त्रांनी बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे लक्ष्य करून नष्ट केले. पाकिस्तानची महागडी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पूर्णपणे निरुपयोगी ठरल्याचे पाहायला मिळाले. भारताची स्वदेशी शस्त्रे, इस्रायली तंत्रज्ञान आणि रशियाची एस-४०० प्रणाली पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखण्यात यशस्वी झाली. याउलट, पाकिस्तानच्या चिनी संरक्षण यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या. भारतीय ड्रोन आणि क्षेपणास्त्रे कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानात घुसली आणि लक्ष्यांवर मारा केला.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.