
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ने प्रतीउत्तर दिल्यानंतर पाकिस्तान सध्या बिथरलं आहे. परिणामी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून पलटवार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्याआधीच भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली आहेत. तसेच त्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ले केले, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे हल्ले परतून लावली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली, यात परराष्ट्र सचिवांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आणि पाकिस्तानची पोलखोलही केली आहे. (Operation Sindoor)
(हेही वाचा – India Pak War : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITI विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण )
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मिस्त्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असतानाही त्याची जबाबदारी नाकारत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. दहशतवाद्यांच्या जनाज्यात पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी आणि नेते मंडळी जातात. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंधही मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची पाकिस्तानची मागणी देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यांबाबत भारताने सर्व पुरावे दिले पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. असे खडेबोल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री (Foreign Secretary Vikram Mistry) यांनी केले.
(हेही वाचा – Starlink in India : एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी)
पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण देतो
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीमेपलीकडून आपल्याविरुद्ध बरीच चुकीची माहिती दिली जात आहे, वाढत्या तणावाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे पहलगाममधील हल्ला हा तणाव वाढण्याचे पहिले कारण आहे, भारतीय लष्कराने (Indian army) काल त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) गट हा लष्कर-ए-तैयबाचा एक सुप्रसिद्ध मोर्चा आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) देत आहोत. टीआरएफबद्दल अपडेट्स सतत दिले जात आहेत. विक्रम मिस्री यांनी एक धक्कादायक खुलासा केला की जेव्हा UNSC च्या निवेदनात TRF चे नाव समाविष्ट करण्याची वेळ आली तेव्हा फक्त पाकिस्ताननेच त्याला विरोध केला आणि ते नाव काढून टाकले. हे स्पष्ट संकेत आहे की पाकिस्तान अजूनही या दहशतवादी गटांना संरक्षण आणि पाठिंबा देत आहे.
हेही पहा –