‘Operation Sindoor’ बाबत माहिती देण्याकरिता आयोजित तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल एके भारती, कमोडोर एएन प्रमोद यांनी संबोधित केले. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले असून भारताच्या कारवाईची माहिती यावेळी दिली. भारताच्या कारवाईबाबत बोलताना राजीव घई यांनी क्रिकेटचा दाखला देत इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील अॅशेस मालिकेशी तुलना केली.
(हेही वाचा Virat Kohli : इंग्लंडच्या काऊंटीकडून विराटला निवृत्तीवरून डिवचणारा व्हिडिओ )
डेनिस लिली, जेम्स थॉप्सन यांच्या भेदक माऱ्याने इंग्लिश फलंदाजाने सळो कि पळो करून सोडले होते. त्यानंतर अॅशेस सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीनंतर एक वाक्प्रचार करण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅशेस टू अॅशेस अँड फ्रॉम डस्ट टू डस्ट अशा शब्दांत इंग्लिश क्रिकेटर्संना इशारा दिला होता. त्याच पध्दतीने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले, असे डीजीएमओ राजीव घई यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, भारताच्या एअरबेस, लष्करी तळं यांना भेदणं शक्य नाही, असे सांगतानाच भारतीय एअर डिफेन्स सिस्टिम लेयर ग्रेड असल्याचेही राजीव घई यावेळी म्हणाले. काल आपण पाकिस्तानच्या हवाई तळांची दुर्दशा पाहिली त्यानंतर आपल्याला कळेल की भारतीय किती जोरदार प्रहार केला. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात भारतीय सैन्यदलांना यश आले. जब हौसले बुलंद हो तो मंजिले भी कदम चुमती है, अशा शब्दांत ऑपरेशन सिंदूरचं विश्लेषण राजीव घई यांनी केले.
Join Our WhatsApp Community