‘Operation Sindoor’ स्थगित असतानाच भारतीय सैन्यदलाला आणखी ४० हजार कोटींची संरक्षण सामुग्री

'Opration Sindoor'नंतर भारताने आपल्या सैन्याला आणखी बळकट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने तब्बल ४० हजार कोटींच्या शस्त्रपुरवठ्यास मान्यता दिली आहे.

99

‘Opration Sindoor’नंतर भारताने आपल्या सैन्याला आणखी बळकट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने तब्बल ४० हजार कोटींच्या शस्त्रपुरवठ्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर(Opration Sindoor) अंतर्गत पाकिस्तानी सैन्याचे क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी वापर करण्यात आलेल्या नवीन शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन अधिकारांतर्गत १५ टक्के बजेट भांडवल उपलब्ध असून करार ४० दिवसांत अंतिम करावे लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने ४० हजार कोटींच्या नवीन शस्त्रपुरवठ्याकरिता तरतूद केली असून संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) आपत्कालीन शक्तींचा (Emergency Power) वापर करून सैन्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी ४०,००० कोटींना मान्यता दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे दि. १७ मे २०२५ रोजी यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संरक्षण मंत्रालय आणि तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा YouTuber Jyoti Malhotra ​​पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली ? )

आपत्कालीन अधिकारांतर्गत, सैन्याला तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालीसाठी देखरेख ठेवणारे ड्रोन, आत्मघाती ड्रओन, लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करता येईल, असे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. या कार्यवाहीमुळे ऑपरेशन सिंदूर(Opration Sindoor) गेलेल्या ब्राह्मोस आणि स्कॅल्प क्रूझ यासारख्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे.

ऑपरेशन सिंदूर(Opration Sindoor) नंतर भारत ४० हजार कोटींची संरक्षण उपकरणे खरेदी करणार असून पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त करणाऱ्या ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्रूझचा पुरवठा वाढणार आहे. यानिर्णयाच्या अंमलबजावणीनंतर तिन्ही सैन्यदलांकडे पूर्वीपेक्षा जास्त दारूगोळा असेल, अशी माहिती समोर आली आहे. एकंदरीत, सर्व शस्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून सर्व खरेदी या मर्यादेतच कराव्या लागतील. यामध्ये, एकाच वेळी डिलिव्हरीची हमी द्यावी लागते.(Opration Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.