‘Operation Sindoor’नंतर पहिल्यांदाच संरक्षण दल प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भारतीय सैन्याच्या मोक्याच्या लष्करी तळांना भेटी देत शौर्य आणि निपुणतेची प्रशंसा केली आहे. सीडीएस प्रमुखांनी सशस्त्र दलांचे मनोबल वाढविण्याकरिता सोमवार, १९ मे २०२५ रोजी धोरणात्मकतृदृष्ट्या महत्त्वाच्या सुरतगड लष्करी तळ आणि नलिया हवाई दल तळाला भेट दिली. बदलत्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी परिचालन तत्परता व काळानुरूप बदल घडविण्याचे महत्त्व अधोरेखित करत सीडीएस प्रमुखांनी सैनिकांशी संवाद साधला.
(हेही वाचा “गोली उन्होने चलाई थी पर धमाका हमने किया”; Operation Sindoor बाबत भारतीय लष्कराच्या जवानाने दिली माहिती )
दरम्यान, संरक्षण दल प्रमुखांनी कर्मचाऱ्यांची परिचालन सज्जता आणि उच्च मनोबलाचे कौतुक करत भविष्यातील धोक्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. सीडीएस प्रमुख जनरल चौहान यांनी ऑपरेशन(Operation Sindoor)च्या सक्रिय टप्प्यात सैनिकांच्या असामान्य शौर्याचे आणि निपुणतेचे कौतुक केले. सुरक्षेचे उल्लंघन करण्याच्या शत्रूच्या अनेक प्रयत्नांना निष्फळ ठरविण्याच्या भारतीय सैनिकांच्या समर्पण, धैर्य आणि दृढ वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला.
(हेही वाचा ‘Operation Sindoor’ची माहिती जगभर पोहोचविण्यास तृणमूल खासदार युसूफ पठाण यांचा नकार )
सैनिक लष्करी कार्य निपुणतेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतात, असे ते म्हणाले. कोणत्याही आव्हानाला निर्णायक क्षमतेने उत्तर देण्यासाठी सदैव तयार राहण्याच्या गरजेवर जनरल चौहान यांनी भर दिला. संरक्षण दल प्रमुखांनी आपल्या भाषणात आंतरसेवा समन्वयाची प्रशंसा केली. स्थानिक नागरी प्रशासनाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच अशा गंभीर परिस्थितीत लष्करी-नागरी समन्वयाचे महत्त्वही जनरल अनिल चौहान यांनी अधोरेखित केले.
Operation Sindoor अंतर्गत भारतीय सैन्यदलांचं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत ०९ मे रोजी भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ०९ तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत पाकिस्तानमधील १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. भारतीय हवाई दलाच्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे सरगोधा, मुरीदके आणि बहावलपूर येथील एअरबेसला उध्द्वस्त करण्यात आले. भारताने पाकिस्तानी लष्करासह नागरिकांवर ही कारवाई केली नसून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना नेस्तानाबूत करण्यात आले. भारताकडून आता ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) फक्त स्थगित करण्यात आले असून दहशतवाद्यांच्या यापुढील कारवाईलाही चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा पुनरुच्चार याआधीच भारताकडून करण्यात आला आहे.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community