Operation Rising Lion : इराणवरील हल्ला का महत्त्वाचा?; पंतप्रधान नेत्यानाहू यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Operation Rising Lion : इस्त्रायल डिफेन्स फोर्सने इराणवर मोठा केला असून राजधानी तेहरान बॉम्बहल्ल्यांनी हादरली. आपरेशन रायजिंग लायन(Operation Rising Lion) अंतर्गत इस्त्रालयने इराणच्या लष्करी व आण्विक तळांना लक्ष्य केले आहे.

106

Operation Rising Lion : इस्त्रायल डिफेन्स फोर्सने इराणवर मोठा केला असून राजधानी तेहरान बॉम्बहल्ल्यांनी हादरली. आपरेशन रायजिंग लायन(Operation Rising Lion) अंतर्गत इस्त्रालयने इराणच्या लष्करी व आण्विक तळांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या तळांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्त्रायली सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, २००हून अधिक इस्त्रायली लढाऊ विमानांच्या हल्ल्यात इराणी सैन्याचे तीन वरिष्ठ कमांडर मारले गेले.(Operation Rising Lion)

 

(हेही वाचा Shani Shingnapur : देवस्थानातील १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश; कारण नेमकं काय? )

महत्त्वाचे म्हणजे इस्त्रायलकडून इराणमधील हवाई तळ व अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात इराणच्या क्रांतिकारी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) कमांडर व काही अणुशास्त्रज्ञ मारले गेले. इस्त्रायलकडून कारवाईला ‘रायझिंग लायन'(Operation Rising Lion) असे नाव देण्यात आले आहे. या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नेतान्याहू यांनी हल्ल्याला दुजोरा देत इस्रायलने इराणच्या अणुबॉम्ब शास्त्रज्ञांवरही हल्ला केल्याचे म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाबद्दल व इराणच्या अणुकार्यक्रमाचा सामना केल्याबद्दल नेत्यानाहू यांनी आभार मानले.

 

अणुबॉम्ब शास्त्रज्ञांवर हल्ला – इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

इराणवरील हवाई हल्ल्याबाबत बोलताना पंतप्रधान नेतान्याहू यांनी सांगितले की, इस्रायलने आता कारवाई केली नाही तर पुढच्या पिढीचे अस्तित्व धोक्यात येईल. ते पुढे म्हणाले, इराणकडे आता ०९ अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम आहे. इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून इस्त्रायल रोखेल. तसेच, इराणच्या अणुकार्यक्रमाला व आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे इस्रायली सुरक्षा दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलमध्ये आणीबाणी व सुरक्षा

ऑपरेशन रायझिंग लायन(Operation Rising Lion)नंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवरील हल्ल्यानंतर देशभरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली. इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता असल्याचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हटले आहे. इस्रायलमध्ये सायरन वाजविले जात असून पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.(Operation Rising Lion)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.