गुरुवार, ८ मेच्या रात्री पाकिस्तान सैन्याने भारताच्या सीमारेषेवरील १५ ठिकाणी तिहेरी हवाई हल्ला केला. ड्रोन्स, रॉकेट लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारताच्या अत्याधुनिक सुदर्शन – ४०० (S 400) एअर डिफेन्स सिस्टीमसह (Air defense system) एल-70 गन, Zu-23 मिमी अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि शिल्का प्रणालीने पाकिस्तानचा हा हल्ला अपयशी ठरवला. भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर रात्रभर ड्रोन हल्ले करत शत्रूला चांगलाच धक्का दिला आहे. (India Pak War)
(हेही वाचा – IPL to Halt ? भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यावर बीसीसीआयचा विचार सुरू)
देशाच्या (Operation Sindoor) अनेक शहरांमध्ये अलर्ट असतांना मुंबईच्या (Mumbai) साकिनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सहार विमानतळ (Sahar Airport) येथून या संदर्भात फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. प्राथमिक माहितीनुसार, हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता. काही क्षणांतच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकिनाका पोलीस ठाण्याने तत्काळ कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) सुरू केले आहे. पोलीस विविध पथकांसह परिसरात तपास करण्यात आला. या प्रकरणी साकीनाका पोलीस आणि सीआयएसएफ यांनी हरी मस्जिद परिसर (Hari Masjid Premises) जरी मरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे. मात्र, यात असे ड्रोन वैगरे काहीही आढळून आले नाही. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साकीनाका पोलिसांनी केले आहे.
साकिनाका विभाग विमानतळ परिसर असल्यामुळे अति संवेदनशील विभाग म्हणून साकीनाकाकडे पाहिले जात आहे. (India Pak War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community