छत्तीसगडमधील अबुझमद येथे नक्षलवाद्यां(Naxalites)विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. नक्षलविरोधी(Naxalites) कारवाईत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा प्रमुख नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याला ठार करण्यात आले आहे. भारतातील नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत हा एक मैलाचा दगड ठरला आहे. याकारवाईमुळे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यां(Naxalites)चा सर्वोच्च नेता मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षलवाद्यांविरोधात बुधवार दि. २१ मे रोजी अबुझमद येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे.
(हेही वाचा National Herald Case : “लूटा है तो लौटाना है”; ईडीच्या दाव्यानंतर भाजपाने साधला निशाणा )
दरम्यान, नक्षलवाद्यांचा उच्चपदस्थ नेता असलेला बसवराजू हा ७० वर्षीय अभियंता नेहमी ‘AK-47’ बाळगत असे. नक्षलवाद्यांविरुध्दच्या कारवाईतील ऐतिहासिक यशानंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच नक्षलवाद्यां(Naxalites)चा म्होरक्या मारला गेला. हे आपल्या शूर सुरक्षा दलांसाठी आणि एजन्सींसाठी एक मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली पोस्ट
पुढील वर्षात ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आतापर्यंत टॉप नक्षलवादी नेता ठार, ५४ जणांना अटक तर ८४ जणांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. विशेष म्हणजे ऑपरेशन ‘ब्लॅक फॉरेस्ट’अंतर्गत नक्षलवादाविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. बुधवार, २१ मे २०२५ रोजी झालेल्या कारवाईत २७ नक्षलवाद्यां(Naxalites)चा खात्मा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर यशाचे कौतुक केले आहे. तसेच, ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल, असा पुनरुच्चार गृहमंत्री शाह यांनी केला.
A landmark achievement in the battle to eliminate Naxalism. Today, in an operation in Narayanpur, Chhattisgarh, our security forces have neutralized 27 dreaded Maoists, including Nambala Keshav Rao, alias Basavaraju, the general secretary of CPI-Maoist, topmost leader, and the…
— Amit Shah (@AmitShah) May 21, 2025
बसवराजू कोण होता?
बसवराजू (खरे नाव नंबला केशव राव) हा भारतातील नक्षलवादी संघटना सीपीआय-माओवादीचा प्रमुख आणि सूत्रधार होता. तो नक्षलवादी चळवळीचा कणा मानला जात होता आणि देशभरात नक्षलवादी संघटना चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेन अल कायदाचा प्रमुख होता किंवा प्रभाकरन एलटीटीईचा प्रमुख होता, त्याचप्रमाणे बसवराजू भारतातील नक्षलवाद्यां(Naxalites)चा प्रमुख होता. अबुझमदमधील नक्षलवादावर सुरक्षा दलांचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
बसवराजूवर किती कोटीचे बक्षीस होते?
भारत सरकारने बसवराजूवर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या धोकादायक कारवाया आणि देशाला त्याने निर्माण केलेल्या धोक्याचे प्रतिबिंब या बक्षीस रकमेत आहे.
त्याने कुठे शिक्षण घेतले?
बसवराजू हा एक सुशिक्षित नक्षलवादी होता. त्याने वारंगलमधील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय(आरईसी)मधून बी.टेक(अभियांत्रिकी) केले होते. एक अभियांत्रिकी पदवीधर देशातील सर्वात मोठ्या अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांपैकी एक असलेल्या नक्षलवादाचे नेतृत्व करत होता हा विरोधाभास आहे.(Naxalites)
Join Our WhatsApp Community