छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यां(Naxalite)वर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली असून २५ हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या पथकाला घेरत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, सकाळपासूनच अबुझमदच्या जाटलूर भागात चकमक सुरू असून यात २५ हून अधिक नक्षलवादी(Naxalite) ठार झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सुरक्षा दलांनी सकाळपासून सुरू असलेल्या गोळीबारात २५ हून अधिक माओवादी ठार झाल्याचे वृत्तास अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. परंतु, नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी सांगितले की, डीआरजी नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव यांनी अबुझमदमध्ये कारवाई सुरू केली असून सकाळपासून ही चकमक सुरू आहे. तसेच, नक्षलवाद्यां(Naxalite)विरोधात करण्यात आलेल्या चकमकीचा तपास सुरू असून लवकरच अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे.
बिजापूरमध्ये ५ नक्षलवादी ठार
काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या नक्षलविरोधी ऑपरेशन अंतर्गत छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूरात मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील कर्रेगुट्टाच्या वनप्रदेशात सुरक्षा दलांनी चोख कारवाई करत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.(Naxalite)
Join Our WhatsApp Community