Naxalism :   छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर Naxalist वर कारवाई, पुढील वर्षापर्यंत देश नक्षलमुक्त…;केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्धार

Naxalism :  केंद्रीय गृहमंत्री (Naxalism)नक्षलवादाचा नायनाट करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला असून मागील २१ दिवसांत १२०० चौरस किमी नक्षलवादी प्रदेश उद्ध्वस्त करण्यात आला आहे.

31

Naxalism :  केंद्रीय गृहमंत्री (Naxalism)नक्षलवादाचा नायनाट करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला असून मागील २१ दिवसांत १२०० चौरस किमी नक्षलवादी प्रदेश उद्ध्वस्त करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादविरोधी ऑपरेशनचे कौतुक केले असून आतापर्यंत २००हून अधिक बंकर, ४५० आयईडी निकामी नेस्तानाबूत करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचा नायनाट करण्याचा संकल्प यामाध्यमातून केंद्राने व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

(हेही वाचा Jammu and Kashmir : ४८ तासांत दोन चकमकी, सहा Terrorist ठार! कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंध, जाणून घ्या )

दरम्यान, नक्षलवादा(Naxalism)विरोधात दि. २१ एप्रिलपासून कारवाई सुरू झाली असून या कारवाईत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यात १६ महिला व १५ पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या नक्षलवाद्यांवर एकूण १ कोटी ७२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. आता सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे १२०० चौरस किलोमीटरचा परिसर नक्षलमुक्त झाला आहे.

छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर सुरू करण्यात आलेले नक्षलविरोधी ऑपरेशन पूर्ण झाले आहे. या कारवाईत गुहांमध्ये लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांवर एकत्रितपणे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस होते. गृहमंत्री अमित शहा यांनीही या यशस्वी ऑपरेशनचे कौतुक केले असून त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल.

छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर नक्षलवाद्यांचे ठिकाणे

करेगुट्टा टेकडीवर २०० बोगदे आणि बंकरमध्ये लपण्याचे नक्षलवाद्यांनी ठिकाण बनवले होते. तिथून त्यांनी त्यांचे ऑपरेशन केले. सुरक्षा दलांनी हे बोगदेही उद्ध्वस्त केले असून येथे नक्षलवाद्यांनी ४ शस्त्रास्त्र कारखाने बांधले होते. ते देखील सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले आहेत. नक्षलवाद्यांनी हा डोंगर खूपच दुर्गम बनवला होता. त्यांनी येथे ४०० हून अधिक आयईडी पेरले होते. त्यांना वेगळे केल्यानंतर सुरक्षा दल पुढे सरकले. यावेळी काही स्फोटही झाले ज्यामुळे १८ सैनिक जखमी झाले. या सैनिकांवर उपचार सुरू आहेत.(Naxalism)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.