सैन्य दला विषय खोटी व अर्धवट माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करून गैरसमज आणि सैन्य दलातील जवानांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून बडतर्फ जवानाविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Nashik)
(हेही वाचा – Pakistan-Turkey Conspiracy : पाकिस्तान-तुर्कीमध्ये भारतविरोधी कारवायांना उत उघड; अहवालाने उघड केले षड्यंत्र)
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन गंगाधर गुंजाळ (वय ३८) हे आर्टिलरी स्टॅटिक वर्कशॉप, देवळाली कॅम्प येथे नायब सुबेदार या पदावर कार्यरत असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंदू बाबुलाल चव्हाण (रा. मोहाडी, जि. धुळे) या बडतर्फ जवानाने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करून विविध खोटी विधाने करणारे व्हिडीओ प्रसारित केले आहेत. आरोपी चंदू चव्हाण याने २६ मे २०१४ पासून ते आजपर्यंत सोशल माध्यमांवर भारतीय सैन्याची बदनामी करणारे अनेक व्हिडीओ प्रसारित केले. या व्हिडीओमध्ये सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी अनादर दर्शविणारी नागरिकांमध्ये सैन्याबद्दल अविश्वास निर्माण करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. तसेच, सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आल्यानंतरही संबंधिताने पुन्हा सैनिकी गणवेश घालून सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करत मर्द नेताओं की तलाश है असा फलक गळ्यात घालून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्याचप्रमाणे संबंधिताने जनतेला सैन्यदलात भरती होऊ नये, अशा आशयाची चिथावणीखोर विधाने केली असून, बडतर्फ जवानांची संघटना स्थापन करून शासनविरोधात चुकीचे आरोप करत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ करीत आहेत. (Nashik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community