पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये आज 29 मे रोजी संध्याकाळी मॉक ड्रिल (Mock drill) आयोजित करण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने २९ मे रोजी प्रस्तावित केलेला मॉक ड्रिल ‘ऑपरेशन शील्ड’ प्रशासकीय कारणांमुळे सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भात, सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यास सांगण्यात आली आहे. (Mock drill)
‘सर्व संबंधित अधिकारी आणि भागधारकांना कळवावे की ऑपरेशन शील्ड नागरी संरक्षण सराव पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल, सरकारी आदेशात असंही म्हटले आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते. पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या सर्व २० जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल रद्द करण्यात आल्या आहेत. (Mock drill)
हेही वाचा- मंत्री Akash Fundkar यांच्या पुढाकाराने कलाकारांच्या हक्कांसाठी समितीची घोषणा
जम्मू प्रदेशात होणारे मॉक ड्रिल आता होणार नाही. केंद्राच्या आदेशानंतर राजस्थान, गुजरात, हरयाणा, चंदीगड आणि इतर राज्यांनीही मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट पुढे ढकलले आहेत. गुजरात माहिती विभाग आणि राजस्थान गृह विभागानेही मॉक ड्रिल पुढे ढकलल्याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. दुसरीकडे, आता गुरुवारी ब्लॅकआउट किंवा मॉकड्रिल होणार नाही, असं चंदीगड प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Mock drill)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community