ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा Ministry of Defence ‘हा’ महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ministry of Defence : ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण मंत्रालय(Ministry of Defence) महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण मंत्रालय(Ministry of Defence) ३०,००० हजार कोटींच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीस मंजुरी देण्याची शक्यता आहे.

78

Ministry of Defence : ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण मंत्रालय(Ministry of Defence) महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण मंत्रालय(Ministry of Defence) ३०,००० हजार कोटींच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीस मंजुरी देण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण विभागा(Ministry of Defence)ने याआधीदेखील शस्त्रास्त्र खरेदीस मान्यता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संरक्षण प्रणालीस बळकटी देणारा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.(Ministry of Defence)

(हेही वाचा Assam Government : अवैध घुसखोरांना मोठा दणका; ७ दशके जुना कायदा पुन्हा वापरात आणणार )

संरक्षण विभागा(Ministry of Defence)कडून नवीन जमिनीवरून हवेत मारा करणारी QRSAM हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालय(Ministry of Defence) पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात करण्यासाठी आर्मी एअर डिफेन्ससाठी स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन जमिनीवरून हवेत क्षेपणास्त्र प्रणाली (QRSAM)च्या तीन रेजिमेंट खरेदी करण्याचा प्रस्ताव हाती घेणार आहे, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.

(हेही वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर डीजीएमओ Lt Gen Rajiv Ghai आता लष्कराचे रणनिती उपप्रमुख )

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय हवाई संरक्षण प्रणालींने पाकिस्तानी लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले. त्यानंतर आता संरक्षण मंत्रालया(Ministry of Defence)कडून लवकरच ३० हजार कोटींच्या संरक्षण प्रणालीस मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटने(डीआरडीओ)ने विकसित केलेली क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत गतिमान आहे. या संरक्षण प्रणालीत लक्ष्य शोधण्याची, ट्रॅक करण्याची आणि कमी थांब्यावर गोळीबार करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.(Ministry of Defence)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.