Ministry of Defence : भारतीय लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची गोपनीयता राखण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालया(Ministry of Defence)ने परिपत्रक प्रसिध्द केले आहे. संरक्षण मंत्रालया(Ministry of Defence)ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सेवारत किंवा निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या खाजगी निवासस्थानी मुलाखती घेणे टाळा. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या सततच्या कव्हरेजनंतर व्यक्तिगत जीवन उघडकीस आले होते. त्यानंतर आता संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(Ministry of Defence)
(हेही वाचा सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी ‘Operation Sindoor’ मागची भूमिका केली स्पष्ट, म्हणाले… )
संरक्षण मंत्रालया(Ministry of Defence)च्या परिपत्रकानुसार, अधिकृत माध्यमांद्वारे स्पष्टपणे आमंत्रित किंवा परवानगी मिळाल्याशिवाय सेवारत किंवा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना भेट देणे टाळावे, तसेच कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती जाहिर करू नये. निवासी पत्ते, कुटुंबातील सदस्यांचे फोटो किंवा सार्वजनिक हिताच्या नसलेल्या इतर गैर-कार्यात्मक माहितीसह वैयक्तिक तपशीलांचे प्रकाशन किंवा प्रसारण टाळा, असे मंत्रालया(Ministry of Defence)ने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
Ministry of Defence issues advisory on respecting the privacy of senior armed forces personnel and their families
“Refrain from visiting or attempting to contact the private residences or families of serving or retired Armed Forces personnel for personal stories or interviews,… pic.twitter.com/yEE6vXfSp8
— ANI (@ANI) June 3, 2025
संरक्षण मंत्रालयाने असा निर्णय का घेतला?
केंद्रीय संरक्षण मंत्रालया(Ministry of Defence)ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरवेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे सातत्याने लोकांच्या नजरेत आले आहेत. मंत्रालया(Ministry of Defence)च्या असे लक्षात आले आहे की, लष्करी अधिकाऱ्यांचे सततचे कव्हरेज व्यावसायिक कव्हरेजच्या मर्यादेपलीकडे गेले असून ते अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत पोहोचले आहे.(Ministry of Defence)
Join Our WhatsApp Community