Microsoft : रशियन भागीदारी असलेल्या तेल कंपनीचे खाते मायक्रोसॉफ्ट(Microsoft) कंपनीने ब्लॉक केले. कुठलीही पूर्वसूचना न देता मायक्रोसॉफ्ट(Microsoft)कडून नायरा एनर्जीचे खाते मायक्रोसॉफ्टकडून ब्लॉक करण्यात आले आहे. त्याचसोबत, एक्सेल डेटा देखील थांबविण्यात आला असून आता नायरा एनर्जीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.(Microsoft)
(हेही वाचा Foreign Higher Education : विदेशात शिक्षणाकरिता जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; ‘युजीसीकडून परवानगी मिळताच…’ )
दरम्यान, २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अनेक मोठ्या पाश्चात्य कंपन्यांनी रशियामधील त्यांचे कामकाज स्थगित केले. या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे पालन व बदलत्या राजकीय परिस्थितीचे कारण असल्याचे सांगितले. मार्केटिंग कंपनी नायरा एनर्जीने मायक्रोसॉफ्ट(Microsoft)विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(Microsoft)
नायरा एनर्जी ही रशियाच्या सहभागासह भारतातील एक आघाडीची तेल शुद्धीकरण व विपणन कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ईमेल अॅक्सेससारख्या आवश्यक डिजिटल सेवा बंद केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, मायक्रोसॉफ्ट(Microsoft)च्या या निर्णयामुळे संपूर्ण भारतातील त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला असून कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.(Microsoft)
निर्बंधांचे परिणाम व कामकाजावर परिणाम
अलीकडेच युरोपियन युनियन(EU) ने रशियन तेल कंपनी रोझनेफ्टशी संबंध असल्याने नायरा एनर्जीवर निर्बंध लादले आहेत. या निर्णयानंतर अनेक परिणाम दिसून आले. तथापि, मायक्रोसॉफ्टचे मुख्यालय अमेरिकेत आहे आणि नायरा असा युक्तिवाद करते की मायक्रोसॉफ्ट(Microsoft) कंपनी कोणत्याही प्रकारे यूएस किंवा भारतीय कायद्यांतर्गत EU निर्बंध लागू करू शकत नाही.
EU निर्बंधांनंतर, किमान दोन जहाजांनी नायरा यांच्या वाडीनार रिफायनरीमधून रिफाइंड उत्पादनांचे लोडिंग पुढे ढकलले. तसेच, रशियन युरल्स क्रूड वाहून नेणारा टँकर त्याच्या मार्गावर वळवण्यात आला. या संपूर्ण संकटादरम्यान, नायराचे सीईओ यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागी सर्गेई डेनिसोव्ह यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(Microsoft)
नायराने न्यायालयाकडून तात्काळ दिलासा मागितला
कंपनीने दाखल केलेल्या याचिकेत अंतरिम आदेश व सेवा त्वरित पुनर्संचयित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नायराचे म्हणणे आहे की मायक्रोसॉफ्ट(Microsoft)ने हे पाऊल ‘एकतर्फी, कोणतीही पूर्वसूचना, सल्लामसलत किंवा संवाद न करता’ उचलले आणि ते ‘कायदेशीर अनुपालनाच्या’ नावाखाली केले गेले.
विशेष म्हणजे नायराने वापरलेल्या सेवा ‘पूर्णपणे पैसे भरलेल्या परवान्याखाली’ घेतल्या गेल्या. यामुळेच ही कारवाई आणखी अन्याय्य वाटते. नायराचे म्हणणे आहे की मायक्रोसॉफ्ट(Microsoft)च्या या कारवाईमुळे त्यांना स्वतःचा डेटा आणि स्वतः बनवलेल्या साधनांमध्ये आणि उत्पादनांमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. मंगळवार, २९ जुलैला लादलेल्या या बंदीचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला आहे.(Microsoft)
Join Our WhatsApp Community


