Sanjay Raut : राऊत बंधू धमकी प्रकरणी मयूर शिंदेला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

142

राऊत बंधू धमकी प्रकरणात अटक करण्यात आलेला मयूर शिंदे याला न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयूर शिंदे याला बुधवारी ठाण्यातून अटक करण्यात आली होती, या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांना ८ जून रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात १० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी रिजवान अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोघांना गोवंडी येथून अटक करण्यात आली होती, दरम्यान या दोघांच्या चौकशीत आणखी काही जनाची नावे समोर आल्यानंतर कांजूरमार्ग पोलिसांनी मानखुर्द येथे राहणार आकाश पटेल (२९) आणि धारावी येथून मोहम्मद मुन्ना मुस्ताक शेख उर्फ मुन्ना (३८) याला अटक करण्यात आली होती. मुन्ना यानेच राऊत बंधू याना फोनवर धमकी दिल्याचे समोर आले.

(हेही वाचा Muslim : आधीच ११ मुले, २२ नातवंडांची आजी असलेल्या ६२ वर्षीय रोकैयाने २७ वर्षीय महंमदशी केले लग्न!)

मुन्नाच्या चौकशीत मयूर शिंदे याचे नाव समोर आले, मयूर शिंदे याच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी मयूर याला बुधवारी रात्री ठाण्यातून अटक करण्यात आली. मयूर शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून राऊत बंधूचा निकटवर्तीय देखील मानला जातो. गुरुवारी कांजूरमार्ग पोलिसांनी मयूर शिंदे आणि मुन्ना या दोघांना मुलुंड महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना १९ जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.