Naxalite : १५ पोलिसांना ठार करणाऱ्या नक्षलवाद्याचा खात्मा

195

धानोरा तालुक्यातील बोधीटोला जवळ गुरुवारी, १४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.

पोलीस जवानांवर हल्ला करण्याचा होता डाव  

पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील गोडलवाही या शेवटच्या चौकीपासून १० किलोमीटर अंतरावर बोधीटोलाजवळील सीमेवर नक्षल्यांची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही टोळी पोलीस जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत होती. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान वाढवले. त्यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite) चकमक उडाली. एक तास चाललेल्या या चकमकीत नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले. परिसरात पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेत दोन नक्षल्यांचे (Naxalite) मृतदेह आढळले. त्यांच्याकडे एके ४७ सारख्या घातक शस्त्रासह एसएलआर बंदूक आढळून आली. यातील एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये नक्षल्यांनी जांंभूळखेडा भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. यात गडचिरोली पोलीस दलातील १५ जवान शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता. दुसऱ्या नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

(हेही वाचा Parliament Attack : संसदेतील घुसखोरी शहरी नक्षलवाद्यांचा कट?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.