पाकड्यांना नामोहरम करणाऱ्या S-400 ची खरेदी काँग्रेसच्या काळात रखडलेली; पर्रीकरांमुळे पाहायला मिळत आहेत ‘हे’ दिवस

वर्षानुवर्षे पॉलिसी पॅरालिसिसमध्ये अडकलेल्या लष्कराला तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बाहेर काढले. त्यानंतर राफेल असो वा S-400 ची खरेदी करून पर्रीकरांनी महत्वाचे निर्णय घेऊन एकेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावला.  

131

पाकड्यांची क्षेपणास्त्रे निष्प्रभ करणारी S-400 प्रणाली विकत घेण्याचा निर्णय कित्येक वर्ष प्रलंबित होता. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या चिकाटीने हा व्यवहार पूर्ण झाला. हा व्यवहार होत असताना फार क्वचित केले जाते असे डिफेन्स परचेस प्लॅनचे रिव्हॅल्यूएशन केले. यातून देशाचे तब्बल ४९,३०० कोटी रुपये वाचवले होते. त्यामुळेच सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारताचे सैन्य पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडत रणांगण दणाणून सोडले आहे.

S-400 चा व्यवहारामागील काय आहे कहाणी? 

S-400 खरेदीमधून देशाचे ४९ हजार ३०० कोटी रुपये वाचले आहेत. आता काही दिवस S-400 च्या खरेदीची कौतुक होईल. अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता केलेली ५ सिस्टिम्सची खरेदी कौतुकास्पदच आहे. पण ह्यात एक मोठे कौतुक मनोहर पर्रीकर यांचे आहे. भारतीय डिफेन्स प्रिपेरेशनमध्ये आपल्या अल्प कार्यकाळात मोलाची भर घालणाऱ्या मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. वर्षानुवर्षे पॉलिसी पॅरालिसिसमध्ये अडकलेल्या लष्कराला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर राफेल असो वा S-400 ची खरेदी करून पर्रीकरांनी महत्वाचे निर्णय घेऊन एकेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावला.

(हेही वाचा पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात)

संरक्षण क्षेत्रात खरेदीला आणला वेग 

एअर डिफेन्स स्ट्रॅटेजी आखताना शत्रूची विमाने, क्षेपणास्त्र दुरूनच पाडायची सोय करताना तीन टप्प्यांचा विचार होतो. लांब पल्ल्याचा, मध्यमचा आणि जवळचा हल्ला थांबवणे. S-400 खरेदी लांब पल्ल्यावरील हल्ला हवेतल्या हवेतच उधळून लावण्यासाठी केली गेली आहे. ३८० किमी रेंजमधील हल्ला थांबवण्याची क्षमता असणाऱ्या ह्या ५ डिफेन्स शिल्ड्सची खरेदी करण्याचा विचार पर्रिकरांच्या काळातच झाला. त्यावेळी पर्रिकरांनी एक दुसरी मोठी कामगिरी पार पाडली. डिफेन्स परचेस प्लॅनच्या रिव्हॅल्यूएशनची कामगिरी त्यांनी केली. आपल्या एअरफोर्सने 2027 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात, शॉर्ट-मिडीयम-लॉंग रेंज डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीची आखणी करून ठेवली होती. S-400 खरेदीचा निर्णय झाल्यावर ह्या पुढील १५ वर्षांच्या खरेदीची किती गरज उरणार ह्याचा सखोल आढावा घेतला. आढाव्यात एअरफोर्सकडून टेक्निकल स्टडी झाली. त्या अभ्यासातून हे लक्षात आले की S-400 मुळे आपली शॉर्ट आणि मिडीयम रेंज डिफेन्स सिस्टीमची गरज मोठ्या प्रमाणात घटणार आहे. एअर फोर्सने पुढील १५ वर्षांत, टप्प्या टप्प्याने शॉर्ट आणि मीडियम डिफेन्सच्या प्रत्येकी १०० सिस्टिम्स विकत घेण्याचा प्लॅन केला होता. पर्रीकरांना एअरफोर्सबरोबर चर्चा करून हे ठळकपणे लक्षात आले की हा आकडा S-400 मुळे मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.