पाक बिथरला ! PoK मधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी ; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि …”

178
पाक बिथरला ! PoK मधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी ; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले,
पाक बिथरला ! PoK मधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी ; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि ..."

जम्मू-काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएने तयार केला आहे. एनआयएच्या तपास अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या कटाचे पुरावे सापडले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये केली गेली. भारताला थेट अणुबॉम्बची धमकी देण्यात आली. या घडामोडींना भारत सरकारने देखील गंभीरतेने घेतले आहेत. त्यामुळे या हल्ल्याचा मोदी सरकारने बदला घ्यावा, अशी भावना देशभरात आहे. (PoK)

हेही वाचा-Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती

या भावनेचा आदर करत केंद्र सरकार पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारताकडून पाकिस्तान विरोधात कधीही लष्करी कारवाई केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यामुळे पाकिस्तानदेखील भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे LoC जवळ PoK मध्ये तर अत्यंत भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. बेताब खोऱ्यात दहशतवाद्यांनी त्यांचे शस्त्रे लपवल्याचे तपासात उघड झाले. दहशतवादी हल्ल्यात OGW च्या भूमिकेचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. एनआयएने ओव्हरग्राउंड कामगारांच्या संपर्कांची यादी तयार केली. ओजीडब्ल्यू विरुद्ध प्रशासकीय आणि न्यायालयीन कारवाईची तयारी सुरू आहे. (PoK)

हेही वाचा- Kedarnath Dham 2025 : केदारनाथ धामचे दरवाजे उघडले ! मंदिर 10 हजार किलो फुलांनी सजवले

PoK मध्ये मरदसे (धार्मिक शाळा) बंद करण्यात आल्या आहेत. भारताकडून लष्करी कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे PoK मध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. (PoK)

हेही वाचा- Amit Shah : “हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून…” ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

बिथरलेल्या पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी दिली आहे. मात्र या बंद मदरशांमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते. “नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय,” असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या धार्मिक विभागाचे प्रमुख हाफिज नजीर अहमद यांनी दिलं आहे. (PoK)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.