Made in India : भारताचं ३०,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीचं लक्ष्य

आर्थिक वर्ष २०२६ साठी भारताने हे लक्ष्य निर्धारित केलं आहे.

47
Made in India : भारताचं ३०,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीचं लक्ष्य
Made in India : भारताचं ३०,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीचं लक्ष्य
  • ऋजुता लुकतुके

मागच्या ११ वर्षांत भारतातून संरक्षण सामुग्री निर्यात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या घडीला भारत एकूण १०० देशांना पूर्णपणे भारतात बनलेली संरक्षण सामुग्री निर्यात करतो. आकडेवारी बघायची झाली तर आर्थिक वर्ष २०१४ मध्ये भारताची या क्षेत्रातील निर्यात ही ६८६ कोटी रुपयांची होती. तीच आता २३,६२२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सामुग्री निर्यात करण्यापूर्वी लागणाऱ्या सरकारी परवानग्या कमी केल्यामुळे ही निर्यात आणखी वाढेल असा जाणकारांचा होरा आहे. (Made in India)

औद्योगिक परवाना पद्धती आता सोपी करण्यात आली आहे. तर सुटे भाग निर्यात करण्यासाठी वेगळा परवानाही आता लागत नाही. नियमांच्या या सुलभीकरणामुळे भारताची संरक्षण निर्यात आणखी ३४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. संरक्षण मंत्रालयाने तर २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या निर्यातीचं लक्ष्य ठेवलं आहे. (Made in India)

(हेही वाचा – IPL 2025, Ayush Mhatre : १७ वर्षीय आयुष म्हात्रेला सचिन तेंडुलकरने काय सल्ला दिला?)

मागील आर्थिक वर्षांत भारताने दारुगोळा, सुटे भाग, शस्त्रं आणि संरक्षण प्रणाली ८० देशांमध्ये निर्यात केली आहे. ‘आधुनिक युद्धपद्धतीत वापरली जाणारी तंत्रकुशल क्षेपणास्त्र बनवण्यात भारताने मोठी मजल मारली आहे. आता भविष्यात या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापर होणार आहे. त्यासाठी भारत पूर्वीपासूनच तयार आहे. ब्राम्होस बरोबरच के४ आणि के१५ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी जगाला भारताची या क्षेत्रातील सिद्धता दाखवून दिली आहे. आणि त्याचबरोबर ही क्षेपणास्त्र आपण इतर देशांनाही पुरवली आहेत,’ असं डीआरडीओचे (DRDO) माजी अध्यक्ष रवी गुप्ता (Ravi Gupta) यांनी मनीकंट्रोल (Moneycontrol) या वेबसाईटशी बोलताना सांगितलं आहे. (Made in India)

तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयानेही एप्रिल २०२५ मध्ये ताजी आकडेवारी जाहीर करताना देशातील सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण सामुग्री बनवणाऱ्या कंपन्यांची निर्यात ४२ टक्क्यांनी वाढल्याचं जाहीर केलं होतं. भारताकडून इतर देशांना सर्वाधिक निर्यात होणारी साधनं आहेत ती बुलेटप्रूफ जॅकेट, डॉर्नियर विमानं, चेतक हेलिकॉप्टर, इंटरसेप्टिंग बोटी आणि टॉर्पिडो बोटी. सर्वाधिक निर्यात अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया या देशांना होते. (Made in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.