Kashmir Issue : “काश्मीर हा उभय देशांमधील द्विपक्षीय मुद्दा”; भारतानं अमेरिकेला पुन्हा एकदा ठणकावलं

Kashmir Issue : 'काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे', काश्मीर वादावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीर वादा(Kashmir Issue)त आंतरराष्ट्रीय समुदाय मध्यस्थी करू शकतो का, यासंदर्भात भारताने आपली भूमिका मांडली आहे.

57

Kashmir Issue : ‘काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे’, काश्मीर वादावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीर वादा(Kashmir Issue)त आंतरराष्ट्रीय समुदाय मध्यस्थी करू शकतो का, यासंदर्भात भारताने आपली भूमिका मांडली आहे. नेदरलँड्स दौऱ्यात दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची परखड भूमिका स्पष्ट केली.

(हेही वाचा पंतप्रधान Narendra Modi यांचा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा; म्हणाले, “”माझ्या नसांमध्ये रक्त…” )

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अशा प्रकारच्या मध्यस्थीच्या ऑफरबद्दल एस. जयशंकर म्हणाले, मी म्हटल्याप्रमाणे, हे असे काहीतरी आहे जे आम्ही पाकिस्तानसोबत एकत्र करू. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीरप्रश्नी पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. परराष्ट्रमंत्री म्हणाले, दहशतवाद्यांनी हल्ल्याद्वारे जम्मू-काश्मीरमधील उत्साही पर्यटन उद्योगाला लक्ष्य केले.

(हेही वाचा “…तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच ठोकणार”; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा )

सेच, दहशतवाद्यांनी जाणूनबुजून हल्ल्याला खूपच धार्मिक रंग दिला. अशा प्रकारांना जगाने स्वीकारू नये, असेही परराष्ट्रमंत्री यावेळी म्हणाले. काश्मीर(Kashmir Issue)मधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना परराष्ट्रमंत्री म्हणाले, १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा काश्मीर भारतात सामील झाले, हे एक ऐतिहासिक सत्य असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे बळकावलेला पीओके अधिकृतरित्या हकदार असलेल्यांना मिळाला पाहिजे. आणि ते हकदार आम्ही(भारत) आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.(Kashmir Issue)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.