J&K terrorist encounter: भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकची दहशतवादी संघटना खिळखिळी झाली आहे. अशातच जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. (J&K terrorist encounter)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack मधील दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर; पोलिसांनी लावले पोस्टर्स)
शोपियांच्या जम्पाथरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. देशात घुसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम पुन्हा वेगवान करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून दहशतवाद्यांची शोधमोहिम हाती घेतली होती.
(हेही वाचा – India-Pakistan War : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणतात, १३ लाख भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत)
भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केल्यानंतर ही मोहीम काहीशी मागे पडली होती. सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या. आता पुन्हा एकदा कारवाई तीव्र करण्यात आली आहे. जम्पाथरीमध्ये आणखी दोन दहशतवादी लपले आहेत, त्यांच्यासोबत सैन्याची चकमक सुरु आहे. दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार सुरु झाला आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये या दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community