Japan-China : पूर्व महासागरात जपानने घेतला मोठा निर्णय; F-35 लढाऊ विमानांची कुमक वाढवित दिला चीनला शह

Japan-China : जपान-चीन(Japan-China) पूर्व सागरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जपानी हवाई संरक्षणाने मोठा निर्णय घेतला आहे. चीनी हवाई दलाच्या हालचालींचा धोका लक्षात घेता जपानने मुख्य बेट असलेल्या होन्शुमधील कोमात्सु एअरबेसवर नवीन F-35 लढाऊ विमाने तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तरेकडील सीमेवर सैन्याची ताकद मजबूत करण्यासाठी अमेरिकन स्टील्थ फायटर जेट्स तैनात करण्याचा निर्णय जपानी संरक्षणदलाने घेतला आहे.

67

Japan-China : जपान-चीन(Japan-China) पूर्व सागरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जपानी हवाई संरक्षणाने मोठा निर्णय घेतला आहे. चीनी हवाई दलाच्या हालचालींचा धोका लक्षात घेता जपानने मुख्य बेट असलेल्या होन्शुमधील कोमात्सु एअरबेसवर नवीन F-35 लढाऊ विमाने तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तरेकडील सीमेवर सैन्याची ताकद मजबूत करण्यासाठी अमेरिकन स्टील्थ फायटर जेट्स तैनात करण्याचा निर्णय जपानी संरक्षणदलाने घेतला आहे.

(हेही वाचा Tripura Floods : त्रिपुरात सततच्या पावसामुळे हाहाकार, तब्बल १,३०० कुटुंबांचं स्थलांतरण, मुख्यमंत्री म्हणाले… )

दरम्यान, जपानी संरक्षण दलाने कंत्राटावर F 35B व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग लढाऊ विमानांचे न्युटाबारू एअरबेसवर प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी केली असून चीनवर वचक बसविण्यात येणार आहे. जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांनी सांगितले की, जपानच्या समुद्रात (पूर्व समुद्रात) जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा ‘ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेकडो भाजप कार्यकर्त्यांची हत्या’; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा घणाघात )

यूएस एफ-३५ जॉइंट प्रोग्राम ऑफिसनुसार, जपानने नवीन टेक्नॉलॉजी रिफ्रेश-३ (TR-३) कॉन्फिगरेशनमधील पहिले तीन एफ-३५ए जेट्स मिळवल्यानंतर कोमात्सु येथे लढाऊ विमाने तैनात केली आहेत. जपानने नवीन कंत्राटाद्वारे या विमानांची पहिली खेप लवकरच येणार आहे. आता जपानकडे आता एकूण ४१ एफ-३५ए लढाऊ विमाने असून कोमात्सु एअरबेसवर जपानकडून लढाऊ विमानांची तैनाती वाढणार आहे.

जपान-चीन यांच्यातील पूर्व सागरातील नेमका वाद काय?

सेनकाकु बेटावरून जपान आणि चीन(Japan-China) यांच्यात पूर्व सागरात सागरी सीमेचा वाद आहे. याच बेटाला चीनने दियाओयू असे नाव दिले आहे. जपान-चीन यांच्यातील वाद राजनैतिक, धोरणात्मक आणि नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. सेनकाकु बेटावर लोकवस्ती नसली तरी तेथील नैसर्गिक वायू, तेलाचे साठे यांनी समृद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ओकिनावा आणि सेनकाकु हे बेटही ताब्यात घेतले होते. पण, १९७२ मध्ये अमेरिकेने बेटाचा ताबा पुन्हा जपानकडे दिला.

सेनकाकु बेटावर सध्या जपानचे नियंत्रण असून हे बेट कधीही चीनचा भाग नव्हता असं जपानचे म्हणणे आहे. तर जपानने १८९५ मध्ये बळजबरीने चीनचा हा बेट ताब्यात घेतला असा चीनचा दावा आहे. चीनकडून सातत्याने दक्षिणी सागर ते पूर्व सागर यादरम्यान सागरी ताकद वाढवून या बेटांवरही कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु, आता जपानी संरक्षण दलाच्या निर्णयानंतर F 35 लढाऊ विमाने या भागात तैनात करण्यात येत आहेत.(Japan-China)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.