Jammu and Kashmir : दक्षिण काश्मिरात शिजतायत भारतविरोधी कारवायांचे कट; एसआयएचं म्हणणं काय?

Jammu and Kashmir मधील संशयास्पद दहशतवादी ठिकाणांवर स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(एसआयए)ने छापा टाकला आहे. दक्षिण काश्मीरमधील जवळपास २० ठिकाणांवर एसआयएने छापेमारी केली असून यांसदर्भात कसून तपास करण्यात येत आहे.

45

Jammu and Kashmir मधील संशयास्पद दहशतवादी ठिकाणांवर स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(एसआयए)ने छापा टाकला आहे. दक्षिण काश्मीरमधील जवळपास २० ठिकाणांवर एसआयएने छापेमारी केली असून यांसदर्भात कसून तपास करण्यात येत आहे. तपासादरम्यान एजन्सीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार भारतविरोधी दहशतवाद्यांचा सुनियोजित कटाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक तपासात दहशतवादी कट रचण्याचा आणि ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून भारतविरोधी कारवायांचे मनसुबे तपासातून समोर आले आहेत.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या हालचाली होताना दिसून येत आहेत. त्यातच आता स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(एसआयए)ने म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या आपल्या ध्येयावर दृढ आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी व फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध ठोस कारवाई सुरूच राहील, असेही एजन्सीने नमूद केले.

(हेही वाचा शस्त्रसंधीबाबत Shashi Tharoor यांनी काँग्रेसपेक्षा घेतली वेगळी भूमिका; म्हणाले, १९७१ ची परिस्थिती आणि… )

भारताने Jammu and Kashmir च्या मुद्द्यावर कोणत्याही अन्य पक्षाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार दिला आहे. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे भारताविरोधी कारवायांना भारतीय सैन्यदलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाणार असून पाकिस्तानच्या आगळिकीला लगाम घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याआधीच भारत-पाकिस्तान यांच्या युध्दविरामाची घोषणा करण्यात आली होती. शस्त्रसंधीबाबत अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका घेत म्हटले की दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये सामंजस्य झाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या कमांडर्सच्या आदेशानुसार ऑनलाइन माध्यमातून भारतविरोधी प्रचार करण्यातही सहभाग घेतला होता. या कृती भारताच्या सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय अखंडतेला धोका निर्माण करतात. सार्वजनिक अव्यवस्था आणि सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.Jammu and Kashmir

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.