Jammu and Kashmir Flood : ऐन उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी! अचानक पूर आल्याने १०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त ; बचावकार्य सुरू, Video Viral 

Jammu and Kashmir Flood : ऐन उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी! अचानक पूर आल्याने १०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त ; बचावकार्य सुरू, Video Viral 

194

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir Flood) रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारची सकाळ येथील लोकांसाठी भयावह ठरली आहे. या लोंढ्यात तिघांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. डोंगरावरून आलेला ढिगारा गावाकडे आला. सध्या बचावकार्य सुरू आहे. (Jammu and Kashmir Flood)

रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. किश्तवार-पद्दर रस्ता देखील बंद आहे. येथे वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (Jammu and Kashmir Flood)

भूस्खलनाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये डोंगरावरून ढिगारा पडताना दिसत आहे. काही भागात, डोंगराचा ढिगारा रस्ते आणि निवासी भागात पोहोचला आहे. एका व्हिडिओमध्ये तीन-चार टँकर आणि काही इतर वाहने पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडलेली दिसत आहेत. याशिवाय, हॉटेल्स आणि घरांनाही ढिगाऱ्यांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. (Jammu and Kashmir Flood)

रामबन जिल्ह्याच्या उपायुक्तांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या भागात खराब हवामान आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही २४x७ जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०१९९८-२९५५००, ०१९९८-२६६७९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, तसेच सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे. उपायुक्तांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. (Jammu and Kashmir Flood)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.