Israel ने इराणच्या अणू तळांवर लक्ष्यपूर्वक हल्ले केले आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. इस्राईल पाकिस्तानच्याही अणू तळांवर हल्ले करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला सतावू लागली आहे. पाकिस्तानी मीडियाने असे भय व्यक्त केले आहे.
Israel ने केलेल्या हल्ल्यात इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड प्रमुख, लष्करप्रमुख आणि अनेक प्रमुख अणुशास्त्रज्ञ ठार झाले. दोन्ही देशातील युद्धामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. दरम्यान, भारताने इस्रायल आणि इराणला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण पाकिस्तानमध्ये इस्रायलने इराणवरील हल्ल्याबाबत वेगळाच विचार दिसून येत आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी या हल्ल्यावरुन एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे. पाकिस्तान सध्या भीतीच्या छायेत आहे. पत्रकार हमीद मीर यांनी एक वेगळीच भीती व्यक्त केली. त्यांच्या टीव्ही कार्यक्रमात ते म्हणाले की, Israel ने यापूर्वीही पाकिस्तानच्या अणुस्थळांवर हल्ला करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आहेत.
(हेही वाचा Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत दोन मोठे चमत्कार ! धातू वितळला पण भगवद्गीतेचं एक पानही नाही जळालं …)
Israel चे पुढचे लक्ष्य पाकिस्तान असू शकते. जर सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान गप्प राहिला तर ती मोठी चूक असेल. आम्ही गप्प राहणार नाही आणि अशा कोणत्याही प्रयत्नांना योग्य उत्तर देऊ. दरम्यान, इस्रायली हल्ल्यानंतर, इराणने म्हटले की, इस्रायली हल्ल्याची मोठी किंमत इस्रायल आणि अमेरिकेला मोजावी लागेल. इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफझल शेखरची यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, शुक्रवारी Israel ने इस्रायली हल्ल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल.
Join Our WhatsApp Community