पाकिस्तान (Pakistan) इस्रायल विरोधात सर्व मुसलमान देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे भारतावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Israel Iran War) इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना पाकिस्तानकडून इराणला शाहीन-३ (Shaheen-3) या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. शाहीन-३ हे पाकिस्तानकडून विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक मिसाईल (Ballistic Missile) आहे. त्याची रेंज सुमारे २,७५० किमी आहे. या क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे संपूर्ण पश्चिम आशियातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
(हेही वाचा – Ashadi Wari 2025 : राज्य शासनाकडून निर्णय जारी; पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वाचा…)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shahbaz Sharif) यांनी इराणला उघड पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही इराणसोबत सर्व प्रकारे उभे आहोत. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर इराणच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कलम ५१ अंतर्गत इराणच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचेही समर्थन केले.
इराण आणि इस्त्रायलमधील हे युद्ध वाढल्यास पाकिस्तानकडून इराणला मोठ्या प्रमाणावर लष्करी मदत दिली जाऊ शकते. (Pakistan Iran Missile Deal) गुप्तचर संस्थांच्या मते, पाकिस्तान अप्रत्यक्षपणे इराणला मदत करत आहे. एका बाजूला, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, पाकिस्तानने इराणसोबत लष्करी सहकार्य वाढवले असून शाहीन-३ क्षेपणास्त्र पाठवण्याचेही पुरावे सापडले आहेत.
पाकिस्तानने OIC (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन) देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून, इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणाऱ्या देशांनी हे संबंध तत्काळ तोडावेत, अशी मागणी केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, इराणला मदत करण्यामागे पाकिस्तानचा एक हेतू भारताविरुद्ध दबाव निर्माण करणे हा असू शकतो. कारण इराणशी पाकिस्तानचे संबंध बळकट राहिले, तर भारताच्या पश्चिम सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पुरवणे भाग पडेल आणि त्यामुळे पाकिस्तानला रणनीती लाभ होऊ शकतो. (Israel Iran War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community