Israel Iran Conflicts : क्षेपणास्त्र डागून इस्रायलचं विमान पाडलं, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात?

120
Israel Iran Conflicts : क्षेपणास्त्र डागून इस्रायलचं विमान पाडलं, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात?
Israel Iran Conflicts : क्षेपणास्त्र डागून इस्रायलचं विमान पाडलं, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात?

इराण (Iran ), इस्रायल (Israel Iran Conflicts) यांच्यातील वाद पेटला असतानाच इस्रायलला (Israel ) आणखी एक धक्का बसला आहे. लेबनॉनच्या आकाशातून उड्डाण करणारं एक इस्रायली विमान पाडण्यात आलं. हे मानवरहीत विमान होतं. जमिनीवरुन हवेत मारा करणार क्षेपणास्त्र (Israel Iran Conflicts) डागून हे एअरक्राफ्ट पाडण्यात आलं. हल्ल्यानंतर हे विमान (Israel Iran Conflicts) लेबनॉनच्या हद्दीत जाऊन कोसळलं. पण या इस्रायली एअरक्राफ्टला कोणी लक्ष्य केलं? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. (Israel Iran Conflicts)

इराणच्या दूतावासावर एअर स्ट्राइक

इस्रायलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर एअर स्ट्राइक केला. (Israel Iran Conflicts) त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर ३०० पेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी हल्ला केला. त्यानंतर शुक्रवारी इराणसाठी रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एका शहरावर हल्ला करण्यात आला. यामागे इस्रायल असल्याच बोलल जात आहे. दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी स्थिती आहे. (Israel Iran Conflicts)

एकदिवस आधीच इस्रायलकडून लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये हल्ला

रविवारी (२१ एप्रिल) रात्री इस्रायलचं एक मानवरहीत एअरक्राफ्ट लेबनॉनच्या (Lebanon) आकाशातून उड्डाण करत होतं. (Israel Iran Conflicts) त्याचवेळी जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. हे विमान लेबनॉनच्या भागात जाऊन पडलं. हे क्षेपणास्त्र लेबनॉनने डागलं की, इराणने या बद्दल अजून स्पष्टता नाही. या हल्ल्याच्या एकदिवस आधीच इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तीन नागरिक जखमी झाले होते. ज्यांचा मृत्यू झाला, ते सर्वच हिजबुल्लाहचे दहशतवादी होते. इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये हा हल्ला केला होता. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शत्रुत्व खूप जुनं आहे. हमास विरुद्ध युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. (Israel Iran Conflicts)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.